स्थूलवाचन १) सूर्याची भूमिका स्पष्ट करा.
Answers
Answer:
सूर्य हा तारा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी व सूर्यमालेतील इतर पदार्थ (ग्रह, उल्का, लघुग्रह, धूमकेतू आणि धूळ) हे सर्व सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. हा सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे. सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा सूर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते व प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये व हवामानामध्ये बदल घडवते.
Answer:
सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. सूर्याच्या या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे (तारकापुंज) येतात. ही २। (सव्वा दोन) नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
अभिजित नावाचे एक २८वे एक-चरणी नक्षत्र मानले जाते. हे छोटे नक्षत्र उत्तराषाढा आणि श्रवण यां नक्षत्रांदरम्यान येते. अभिजित नक्षत्रात सूर्य २१ ते २३ जानेवारी या काळात असतो.
प्रत्येक नक्षत्राचे चार चरण (भाग) आहेत अशी कल्पना केली आहे. त्यामुळे काही पूर्ण नक्षत्रे व काही नक्षत्रांचे काही चरण मिळून एक रास बनते. एका राशीत २। (सव्वा दोन) नक्षत्रे म्हणजे नक्षत्रांचे एकूण नऊ चरण असतात. चरण दाखवण्याची पद्धत अशी :- आश्विनी-१, मृग-२, चित्रा-३, ४, विशाखा-४ म्हणजे अनुक्रमे - आश्विनी नक्षत्राचा पहिला चरण, मृगाचा दुसरा, चित्राचा तिसरा व चौथा चरण, आणि विशाखाचा चौथा चरण.