स्थानिक वेळ म्हणजे काय ....
Answers
Answer:
आमच्या संशोधनाच्या कामात आम्ही ऐकटे काम करत नाही. एक टिम आमची, एक टिम मोस्को, रशियाची आणि एक सिओल, कोरीयाची. आम्ही दर १५ दिवसांत आॕनलाईन पद्धतीने बैठक (Meeting) करतो ज्यात कोणी किती काम केलं, कोणाची idea फॉलो करायची हाय हेलो जय हिंद जय कोरीया असं काहीतरी चालतं.
आता जेव्हा बैठकीची पुढची तारीख आणि वेळ ठरत असतो तेव्हा भारी गफलत होते. सुदैवाने हे दुदैवी कार्य मीच करतो. पण रशियात आणि कोरीयात वेळ ही भारतीय वेळेपेक्षा पुर्णपणे वेगळी असते. मग सगळ्यांना जमेल अशी तारीख आणि वेळ ठरवावी लागते ते पण सगळ्यांशी विचारपुस करून.
आता आपल्या भारतात वाजत आहेत ११:२३ मिनिटं, रशियात वाजतात ८:५१ मिनिटं सकाळचे आणि कोरियात वाजताय दुपारचे २:५२ मिनिटं..
म्हणजे जर आम्ही ठरवलं की सकाळी सकाळी मस्त ९ वाजता meeting घेऊ की रशियावाले रडतात की, "No, it is too early" कारण तिकडे सकाळचे ६ असातात. बरं मग दुपारी ४ ला घेतली की कोरियावाले रडतात, "No, Kamalakar it is too late".. कारण तिकडे संध्याकाळचे ७ वाजलेले असतात.
जेव्हा तारीख आणि वेळ ठरली की मी सगळ्यांना ई-मेल ने कळवतो की पुढची बैठक २:३० (KST), ९:३० (MST) आणि ११:३० (IST) राहील.
येथे KST = Korean Standard Time आणि MST = Moscow Standard Time आहे. ते आपोआप समजून जातात की कोणाला किती वाजता बैठकीत हजर राहायच आहे.
स्थानिक वेळ म्हणजे तुम्ही जेथे राहताय तेथे आता ह्या क्षणाला नेमके किती वाजत आहेत ते. इंग्रजीत बोले तो लॉकल टाईम.
भारत आणि श्रीलंका देश IST टाईम Zone वापरतात. IST = Indian Standard Time आणि उर्वरीत आशिया खंडात UTC (Coordinated Universal Time) टाईम Zone वापरतात जो IST पेक्षा साधारणतः ५:३० तास मागे आहे.
असे पुर्ण जगात २४ पेक्षा जास्त टाईम झॉन्स आहेत जे एकमेकांशी कमी जास्त फरकाने कार्यरत आहेत.
[☝️❤️]✌️
Answer:
sthanik vel mhanje ekhadya thikanchya sandarbat aakashatil suryacha sthanavarun tharvinyat aaleli vel mhanje tya thikanchi sthanik nel hoy .