CBSE BOARD X, asked by nsiou9507, 2 months ago

सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा जाहिरात लेखन

Answers

Answered by deveshkumar9563
3

Explanation:

विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर होण्यासाठी केलेल्या मार्गदर्शन व सहकार्याबद्दल टिळक हायस्कूलच्या वतीने राहूल पुरोहित यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

कऱ्हाड : येथील लोकमान्य टिळक हायस्कूलमध्ये ‘सुंदर हस्ताक्षर’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. १३ ते २५ एप्रिल दरम्यान सुप्रसिद्ध अक्षर गुरू राहुल पुरोहित यांनी ही कार्यशाळा घेतली. 

लोकमान्य टिळक हायस्कूलने शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून हा नवोपक्रम (गुरुकुल) वर्ग सुरू केला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला योग्य आकार मिळावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे १०० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. हस्ताक्षराचा संबंध प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाशी आहे. व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू हस्ताक्षरातून उलगडतात. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर होण्यासाठी केलेल्या मार्गदर्शन व सहकार्याबद्दल टिळक हायस्कूलच्या वतीने राहूल पुरोहित यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

 

या प्रसंगी शिक्षण मंडळाचे सचिव शेखर देशपांडे, संस्थेचे सदस्य भागवत सर, लाटकर साहेब, मुख्याध्यापक अहिरे सर, उपमुख्याध्यापक कणबरकर, ननावरे तसेच सर्व कर्मचारी, विद्यार्थी, पालक आदी मान्यवर उपस्थित होते.

Similar questions