Physics, asked by sanjyoktihadekar, 3 months ago


३) सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं,तसा आनंद घेणान्याच्या वृत्तीत असतो
या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा​

Answers

Answered by cutie3797
8

Answer:

एखादी व्यक्ती काहीजणांना सुंदर दिसते. तर अन्य काहीजण ती सुंदर नाहीच, यावर पैज लावायला तयार होतात. हा व्यक्ति - व्यक्तींच्या दृष्टींतला फरक आहे. कोणत्या कारणांनी कोणती व्यक्ती कोणाला आवडेल हे काहीही सांगता येत नाही. त्याप्रमाणे कोणाला कशात आनंद मिळेल, हेही सांगता येत नाही. आनंदाच्या तऱ्हा वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो. पोस्टाची तिकिटे किंवा नाणी गोळा करण्याचा नेहमीचा छंद असलेली माणसे आपल्याला ठाऊक असतात. पण एकाला लोकांकडची जुनी पत्रे गोळा करण्याचा छंद होता. एकजण आठवड्यातून एकदा आसपासचा एकेक गाव पायी चालून यायचा. एकच सिनेमा एकाच महिन्यात सात-आठ वेळा पाहणारेही सापडतात. सिनेमातले सर्व संवाद त्यांना तोंडपाठ असतात. ते संवाद ते सिनेमाप्रेमी पुन्हा पुन्हा ऐकवतात. यातून त्याला कोणता आनंद मिळत असेल? यावरून एकच दिसते की, प्रत्येकाची आनंदाची ठिकाणे भिन्न असतात. आनंद शोधण्याची वृत्ती भिन्न असते.

व्यक्तिव्यक्तींमधला हा वेगळेपणा आपण लक्षात घेतला, तर समाजातील अनेक भांडणे संपतील; समाजासमोरच्या समस्यासुद्धा सुटतील. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असते. आवडीनिवडी भिन्न असतात. हे वास्तव आपण ओळखले पाहिजे.

व्यक्तींची ही विविधता ओळखली पाहिजे. या विविधतेची बूज राखली पाहिजे. मग समाजात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी वस्तू निर्माण होतील. रंगीबेरंगी घटना घडत राहतील. समाजजीवन अनेक रंगांनी बहरून जाईल.

Answered by HanitaHImesh
0

दिलेल्या प्रश्नाचे उत्तर खालील प्रमाणे आहे -

  • सुंदरता हि बघणार्याच्या डोळ्यात असते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आपण ज्या पद्धतीने घेतो त्यातच आपले जीवन आहे.
  • दिसण्यावरून आपण कोणाचाही न्याय करू नये, बाहेरून उग्र दिसणारी गोष्ट आतून गोड असू शकते, जे चांगले दिसते ते तपासल्यावर सर्वात वाईट ठरू शकते.
  • शारीरिक आकर्षण म्हणजे फसवणूक; माणसाचा स्वभाव हा खरोखर महत्त्वाचा आहे. सुंदर किंवा देखणी लोक जास्त आकर्षक असतात हे खरे आहे.
  • वर्षानुवर्षे एखाद्या व्यक्तीचे शारीरिक स्वरूप क्षीण होऊ शकते; पण त्यांची पात्रे तसे करत नाहीत. म्हणून, आपण दिसण्यावरून कोणाचाही किंवा कशाचाही न्याय करू नये.
  • आंतरिक सौंदर्य असलेले लोक असे असतात ज्यांना प्रत्येकाशी शांती करणे, सहप्राण्यांची काळजी घेणे आणि न्यायाच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करणे आवडते.

#SPJ2

Similar questions