साधुवाण्याची कथेचा आशय स्पष्ट करा
Answers
Explanation:
आपल्या देशात पिढयान् पिढयांपासून महापुरुषाची, अवताराची वाट पाहण्याची परंपरा आहे. त्यामुळे जरा कुणी वेगळा माणूस दिसला की, आम्ही त्यात ‘देवत्व’ शोधायला लागतो. परिणामी इतरांपेक्षा स्वत: तो माणूसच, मग त्याचे नाव नरेंद्र मोदी असो वा अरविंद केजरीवाल, स्वत:ला सगळयांपेक्षा मोठा मानायला लागतो. आणि तिथेच सगळी गडबड होते.
प्रसिद्ध अमेरिकन लेखक राल्फ वाल्डो इमर्सन यांनी महान माणसांविषयीच्या त्यांच्या निबंधात फार सुंदर वाक्य लिहिले आहे, ‘महापुरुष म्हणजे समुद्राच्या लाटेवरचा फेस.’ त्या वाक्याने साने गुरुजींना भारावून टाकले होते. इमर्सनच्या त्या अद्भुत कल्पनेवर साने गुरुजी लिहितात, ‘‘इमर्सनने किती सुंदर उपमा दिली आहे. लाट किती तरी दुरून चढत, पडत येत असते. शेवटी ती पराकाष्ठेची उंच होते. त्या वेळी त्या लाटेच्या शिखरावर स्वच्छ फेस उधळतो. त्या लाटेचे ते निर्मळ अंतरंग असते. समाजात कित्येक वर्षे चळवळ चालत असते. प्रयत्न होत असतात. पाऊल पुढे पडत असते. चळवळ वाढत-वाढत तिची प्रचंड लाट होते. त्या लाटेच्या शिखरावर महापुरुष उभा असतो. लाटेतील स्वच्छता म्हणजे तो अवतार. जनतेच्या अनंत प्रयत्नातील खळमळ जाऊन जे स्वच्छ, पवित्र स्वरूप वर येते, ते स्वरूप म्हणजे महापुरुष.’’
असे महापुरुष शतकातून किंवा दोन-चार वर्षातून एकदाच जन्माला येतात. कधी छत्रपती शिवाजी म्हणून तर कधी महात्मा गांधी बनून.. महापुरुष अवघे आयुष्य आपल्या समाजासाठी देतात. समाजहिताचा विचार करीतच जगतात आणि मरतातही. म्हणून लोक त्यांना कायम स्मरतात..
महान लोकांच्या वाणी, लेखणी आणि करणीमध्ये सर्वसामान्य माणसाच्या उद्धाराची, उन्नतीची भावना ओतप्रोत भरलेली असते. असा महापुरुष महात्मा गांधीजींच्या रूपाने आम्ही पाहिला, अनुभवला. पण आता मोदी आणि केजरीवाल यांच्यासारखे नेते त्यांची बरोबरी करू पाहताहेत. भारतीय जनता या निवडणुकीत याचा योग्य फैसला लावेलच.
साधुवाण्याची कथेचा आशय खालील प्रकारे स्पष्ट केला आहे.
- आमच्या देशात साधु आणि महात्मा यांची वाट पाहण्याची प्रथा आहे .
- आम्हाला कोणी वेगळा माणुस दिसला की अाम्ही त्यात देवत्व शोधायला लागतो .
त्याचे नाव नरेंद्र मोदी असो की अरविंद
केजरीवाल असो , स्वत ला सगऴया पेक्षा मोठा
मानायला लागतो .
- अमेरिकन लेखक रालफ वाल्डो यानी निबंध लिहिला आहे ,
- त्यात सुंदर वाक्य लिहिला आहे , " महापुरुष म्हणजे समुद्राचा लाटे वरचा फेस ."
- साने गुरुजी लिहितात , इमर्सन ने लाटेला किती सुंदर उपमा दिली आहे , लाट किती तरी दुरुन चढ़त , पड़त येत असते , शेवटी ती पराकाष्ठेची ऊंच होते .
- स्वच्छ , पवित्र स्वरूप म्हणजे महापुरुष असे म्हणतात, महापुरुष शतकातून किंवा दोन चार वर्षातून एकदाच जन्म घेतात , कधी छत्रपति शिवाजी बनवून कधी गांधीजी बनवून .
#SPJ3