स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा-दिशांना,
बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराना ||९||
गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी,
जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागफणी ||२||
लुसलुशीत पाने अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी,
दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी ||३||
सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोरपिसा परी,
सांबर लाल कळ्यांनी लखडून कुठे स्वागता पाणंदीवरी ||४||
पळसफुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती,
कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती ||१||
आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान,
उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान ||६||
Please find the following question from the passage
1)bird came in poem=
2)animal came in poem=
find the tree came in poem
(need 6)
meaning of poem
1)पान =. 2)वसन=
Answers
Answered by
3
Answer:
कवितेत आलेले पक्षी -
वरील कवितेत मोर, कोकिळा या पक्षाचा उल्लेख आला आहे.
कवितेत आलेले प्राणी- कवितेत कुठल्याही प्राण्याचा उल्लेख झालेला नाही.
कवितेत आलेले झाडांची नावे- कवितेत वड, पिंपळ,सांभर, घाणेरी, लिंबोणी व नागफणी या झाडांचा उल्लेख आलेला आहे.
खालील शब्दांचा कवितेतील अर्थ-
१. पान म्हणजे झाडाचे पर्ण.
लुसलुशीत पर्ण अंगावर परिधान करुन वड हा वसंत ऋतू ची वाट पाहत आहे किंवा त्याच्या स्वागतासाठी उभा आहे असे वर्णन केलेले आहे.
२. वसन म्हणजे वस्त्रे.
लिंबोनी देखील गर्द पोपटी रंगाचे वस्त्र परिधान करून वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आली आहे असे वर्णन कवीने केले आहे.
Similar questions