Economy, asked by nileshmali279, 4 months ago

सेवाक्षेत्राच्या वृद्धीस कोणते घटक जबाबदार आहे

Answers

Answered by Mudit7260
0

Answer:

hope it helps you

Explanation:

सेवाक्षेत्र : अर्थव्यवस्थेतील तीन भागांपैकी तिसरा भाग म्हणजे सेवाक्षेत्र. प्राथमिक क्षेत्र व द्वितीयक (निर्माणक) क्षेत्र ही पहिली दोन क्षेत्रे होत. प्राथमिक क्षेत्रात कृषी, पशुपालन, मासेमारी, इत्यादींचा; तर द्वितीयक क्षेत्रात उत्पादन, प्रक्रिया व बांधकाम यांचा समावेश असतो. तृतीयक क्षेत्रात अर्थव्यवस्थेतील सर्व प्रकारच्या अदृश्य स्वरूपातील सेवांचा समावेश होत असल्याने त्यास सेवाक्षेत्र असे संबोधले जाते. माणसाच्या उत्क्रांतीतही तो सर्वप्रथम निसर्गावर अवलंबून होता. त्यामुळे त्यावेळची अर्थव्यवस्था शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम अशा निसर्गाकडून उपलब्ध होणाऱ्या गोष्टींवर अवलंबून होती, म्हणून या क्षेत्राला प्राथमिक क्षेत्र असे म्हणतात. तदनंतर मनुष्यप्राण्याने निसर्गनिर्मित गोष्टींवर प्रक्रिया करून नवनव्या वस्तूंचे उत्पादन व निर्माण सुरू केले. सबब हे द्वितीयक क्षेत्र झाले. सेवांच्या पुरवठ्यावर अर्थव्यवहार हा माणसाच्या उत्क्रांतीतील त्यानंतरचा टप्पा झाला, म्हणून सेवाक्षेत्र हे त्यानंतरचे तृतीयक क्षेत्र अस्तित्वात आले.

सेवा या वस्तूसारख्या दृश्य नसतात. या अदृश्य स्वरूपातील सेवांमुळे प्राथमिक आणि द्वितीयक क्षेत्रे धारणीय व अधिक उपयुक्त स्थितीत येतात. सेवाक्षेत्रातील उद्योगांना ‘ज्ञान अर्थव्यवस्थे’ वर लक्ष केंद्रित करावे लागते. सेवांची निर्मिती व पुरवठा हे या क्षेत्राचे प्रमुख वैशिष्ट्य असून ग्राहकांना सामान्य दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश असतो. सेवाक्षेत्रात प्रामुख्याने व्यापार, वाहतूक, दळणवळण, वित्तपुरवठा व व्यावसायिक स्वरूपाच्या अदृश्य सेवांचा समावेश होतो. ग्राहकांची गरज ओळखूनतिची जलद व कमीतकमी किंमतीला पूर्तता करणे हे सेवाक्षेत्राचेवैशिष्ट्य आहे. ‘बँकिंग’ या सेवाक्षेत्रातील महत्त्वाच्या घटकाकडे पाहिल्यास माहिती व संचार तंत्रज्ञानाचा वापर करून किमान मनुष्यबळाच्या साहाय्याने किमान खर्चात उत्तम व चोवीस तास उत्कृष्ट सेवा देण्यातझालेले बदल सहज समोर येतात.

उत्पादकता, उपयुक्तता, क्षमता, टिकाऊपणा आणि संभाव्यता यांत सुधारणा करण्यासाठी माणसाने आपल्या ज्ञानाचा व वेळेचा उपयोग करून केलेल्या सर्व बाबी सेवाक्षेत्रात येतात. अशा अदृश्य सेवांत वस्तूत सुधारणा करणे, सल्ला देणे, मदत, अनुभव, चर्चा, तज्ज्ञता यांचा समावेश होतो. सद्यस्थितीत सेवाक्षेत्राची व्याप्ती वाढत असून त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे : दूरसंचार, पर्यटन, वित्तपुरवठा, माध्यमे, आदरातिथ्य, कायदेविषयक सेवा, अन्नप्रक्रिया उद्योग, सल्ला सेवा, शिक्षण, गुंतवणूक, किरकोळ विक्री सुविधा इत्यादी. जागतिक पातळीवर समान धोरण असावे यासाठी जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओे) व्यापारातील सेवासंबंधी सामान्य करार (गॅट) १९९१ नुसार सेवाक्षेत्राचे बारा विभागात वर्गीकरण करण्यात आलेले आहे, ते विभाग खालीलप्रमाणे :

please mark me as the brainliest

Similar questions