सावित्रीबाई फुले यांच्या वर आधारित मराठीत भाषण
Speech on savitribai phule in Marathi.
Answers
not sure how to translate this...
सावित्रीबाई फुले ज्यांना आपण स्त्री शिक्षणाच्या जनक मानतो. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये नायगाव साताऱ्यात झाला. त्याचे वडील शेतकरी होते. पूर्वी महाराष्ट्रात बालविवाह प्रथा होती. त्यानुसार सावित्रीबाईचा विवाह वयाच्या ९ व्या वर्षी १२ वर्षाच्या जोतीराव फुले यांच्याशी झाला. १८४८ मध्ये जेव्हा जोतीराव फुलेनी पहिली शाळेची स्थापना केली तेव्हा सावित्रीबाई या त्यांच्या शाळेवर पहिल्या शिक्षिका होत्या. मात्र त्याना शिक्षिका बनण्याआधी समाजाचा खूप मोठा रोष पत्करावा लागला. त्या एक शिक्षिका ,समाजसेविका तसेच चांगल्या कवी देखील होत्या. एका स्त्रीने १८ व्या शतकात समाजाचा रोष सहन करून शिक्षिका बनणे खूप मोठे काम होते मात्र त्यांनी ते करून दाखवले. अश्या या क्रांतिकारी व्यक्तीचा १० मार्च १८९७ रोजी देहान्त झाला . मात्र जाताना त्यांनी आपल्याला बरेच काही दिले ज्या मुळे संपूर्ण महिलावर्ग आज खुल्या मनाने आकाश भरारी घेत आहेत.