Art, asked by nivruttibhawari67, 22 days ago

सावित्री उच्च शिक्षण घेण्यासाठी कोठे गेली ?​

Answers

Answered by ACHINTYALEO26
1

Answer:

hgxzzjzkzCdKcjgxugxdaFkgdjfsxCzg

Explanation:

xgjxkgzzmgxmfskjtzakfjdhd

Answered by vinod04jangid
0

Explanation:

  • सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षण तज्ञ आणि कवियत्री होत्या. त्यांना भारताची पहिली महिला शिक्षिका मानले जाते. पती ज्योतिबा फुले यांच्या सोबत ब्रिटिश राजवटीत भारतीय महिलांना हक्क मिळवून देण्यास त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्याजवळील भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. जाती व लिंगावर आधारित भेदभाव व अन्याय दूर करण्यासाठी त्या आयुष्यभर झगडल्या, महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीतील त्या एक महत्वाची व्यक्ती होत्या. एक समाजसेवी आणि रिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले ह्या एक उत्तम मराठी लेखिका सुद्धा होत्या.
  • सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावी झाला. त्यांचे जन्मस्थान शिरवळ पासून पाच किलोमीटर तर पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मी आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते, सावित्रीबाई त्यांच्या थोरल्या मुलगी होत्या. वयाच्या १०व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचे लग्न तेरा वर्षांच्या ज्योतिराव फुले (महात्मा ज्योतिबा फुले) यांच्याइी झाले. सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांना स्वत:चे मुल नव्हते, म्हणून त्यांनी एका विधवेच्या मुलाला दत्तक घेतले.
  • सावित्रीबाईंच्या लग्नापर्यंत त्यांचे शिक्षण झाले नव्हते. त्याकाळत त्यांच्या जातीमुळे त्यांना शिक्षणाची परवानगी नव्हती. तसेच ज्योतिराव फुलेंनाही जातीच्या कारणामुळे तात्पुरते रिक्षण थांबवावे लागले होते परंतु पुढे त्यांनी स्कॉटिशा मिशानरी शाळेत सातवीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले.
  • पारतंत्र्याच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला आणि आपल्याबरोबर आपल्या पत्नीला शिकवून स्त्री साक्षरतेसाठी पुढाकार घेतला. त्यांच्यामुळेच आज सावित्रीच्या लेकी हर एक क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन आपली आणि समाजाची प्रगती करत आहेत. म्हणून जयंती तसेच पुण्यतिथी निमित्त अशा थोर विभूतींचे स्मरण करणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, ही आपली जबाबदारी आहे.

#SPJ3

Similar questions