Social Sciences, asked by gatharox1339, 11 months ago

स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी लोकमान्य टिळक यांनी दोन वृत्तपत्रांची सुरूवात केली होती? एक मराठा होता. दुसऱ्या वृत्तपत्राचे नाव काय?
(अ) केसरी
(ब) एशियाई मिरर
(क) पुढारी
(ड) भारत जवान

Answers

Answered by rushikesh2035
1
अ) second newspaper name is kesari

Answered by Anonymous
6
hey there..!!


Question : स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी लोकमान्य टिळक यांनी दोन वृत्तपत्रांची सुरूवात केली होती? एक मराठा होता. दुसऱ्या वृत्तपत्राचे नाव काय?

Answer : (अ) केसरी


 टिळक व आगरकर यांनी इंग्रजी भाषेत ‘मराठा’ (२ जानेवारी १८८१) आणि मराठी भाषेत ‘केसरी’ ४ जानेवारी १८८१ रोजी ही वृत्तपत्रे सुरू केली. आगरकर ‘केसरी’चे तर टिळक ‘मराठा’ चे संपादक बनले. त्यानंतर टिळक व आगरकरांनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी पुणे येथे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली. पुढे एका वर्षाने २ जानेवारी, १८८५ रोजी या संस्थेच्या वतीने ‘फर्ग्युसन कॉलेज’ सुरु करण्यात आले.
यापुढील काळात सामाजिक सुधारणेच्या प्रश्नावरून टिळक व आगरकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे आगरकरांनी २५ ऑक्टोबर १८८७ रोजी ‘केसरीच्या’ संपादकपदाचा राजीनामा दिला व टिळक ‘केसरी’चे संपादक बनले. आपल्या या वृत्तपत्रद्वारे टिळकांनी राष्ट्रीय विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य केले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाल्यावर टिळकांनी कॉंग्रेसच्या कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात परकीय सत्तेविरुद्ध लोक जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने केले.


#Be brainly
Similar questions