स्वातंत्र्य संग्राम म्हणजे काय?
Answers
Answered by
1
Explanation:
स्वातंत्र्याचा एक अर्थ म्हणजे ‘राष्ट्रीय’ स्वातंत्र्य. भारताला १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी मिळालेले स्वातंत्र्य हे याच प्रकाराचे आहे. त्यामागे ब्रिटिश राजवटीची आणि तिच्यापासून स्वतंत्र होण्यासाठी जनतेने दिलेल्या लढ्याची पार्श्वभूमी आहे. जगातील अनेक देश जबरदस्तीने वेगवेगळया युरोपिय देशांच्या साम्राज्याचा भाग बनवले गेले होते. त्या राजवटींपासून मुक्त होण्याचा अर्थ या राष्ट्रीय स्वातंत्र्यामध्ये सामावलेला आहे. भारत स्वतंत्र झाला असे आपण म्हणतो तेव्हा ब्रिटीशांच्या म्हणजे परकीय आणि वसाहतवादी राजवटीपासून स्वतंत्र झाला असे आपल्याला अभिप्रेत असते.
Answered by
0
कोणत्याही देशाच्या किंवा प्रदेशाच्या स्वाधीनता किंवा स्वायत्तता याकरिता प्रस्तुत शासनकर्त्याशी लढणे याला स्वातंत्र संग्राम म्हणतात.
- स्वातंत्र्य संग्राम हा क्रांतिकारी व नव विचारी लोकांनी केलेल्या क्रांतीमुळे घडतो.
- स्वातंत्रप्रिय जनतेला अनेक वर्षांपासून सूरु असलेल्या जुलमी राजवटीतुन सोडविण्याकरिता स्वातंत्र लढा दिला जातो.
- अमेरिकेतील जनतेही ब्रिटिश वसहतवाद्यांच्या विरुद्ध स्वातंत्र्यसाठी लढा दिला.
- भारतात दोनशे वर्ष असणाऱ्या इंग्रज राजवटीविरोधात भारतीय जनतेने एकत्रित येऊन लढा दिला.
#SP J
Similar questions