स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात संपन्न या शीर्षकावरून बातमी करा please help me i have lot of thinks to complete
Answers
उत्तर :
★ बातमी लेखन : -
स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात संपन्न
सामना वृत्तसेवा
मुंबई, ता. 16 प्रत्येक भारतीयांसाठी महत्वपूर्ण असलेला दिवस म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा झाला. कोरोनाचे सावट असूनही मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी स्वतंत्रता दिवस शासनाच्या निर्देशानुसार साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिना निमित्त ध्वजारोहण शासकीय तसेच सार्वजनिक ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या भीतीमुळे सर्वांनी नियम पाळत या कार्यक्रमांना उपस्थिती दिली.
ठिकठिकाणी लोकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. बहुतांशी लोकांनी गर्दी करणे टाळले. या खास दिवशी होणाऱ्या सांस्कृतीक कार्यक्रमाची कमतरता सर्वांना होत होती.
स्वतंत्रता दिनानिमित्त अनेक ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले. कार्यक्रमांना भले लोकांची गर्दी कमी होती पण लोकांमधे उत्साह दिसून येत होता.
Answer:
thank you for the answer