स्वातंत्र्यवीरांचे बलिदान कसे होऊ लागले?
Answers
Answer:
Explanation:
स्वातंत्र्यदिनाच्या या पवित्र प्रसंगी सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, त्यामागे भारतमातेच्या लाखो मुलामुलींचे त्याग, बलिदान, आणि भारतमातेला स्वतंत्र बनवण्याप्रती त्यांचा संकल्प, अशा सर्व आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे, स्वातंत्र्यवीरांचे, नरवीरांना, शहीदांना वंदन करण्याचे हे पर्व आहे. आपले सैन्यातील शूर जवान, निमलष्करी जवान, पोलीस, सुरक्षा दलाशी संबंधित प्रत्येकजण, भारतमातेच्या रक्षणात सामान्य माणसांच्या सुरक्षेसाठी काम करत असतात, आज त्या सर्वांना हृदयपूर्वक, आदरपूर्वक स्मरण करण्याचा, त्यांच्या महान त्याग तपस्येला वंदन करण्याचे पर्व आहे.
आणखी एक नाव - अरविंद घोष, क्रांतीदूत ते अध्यात्म यात्रा, आज त्यांची जन्म जयंती आहे. त्यांचा संकल्प पूर्ण करायचा, आपला संकल्प पूर्ण करायचा आहे. त्यांचे आशीर्वाद कायम आपल्याबरोबर राहोत. आज आपण विशिष्ट परिस्थितीतून जात आहोत. आज छोटी मुले माझ्यासमोर दिसत नाहीत. आपले उज्वल भविष्य, कोरोनाने सर्वांना रोखले आहे.
स्वातंत्र्याच्या लढाईत भारताने पूर्ण जगात आपली एकजुटतेची, सामूहिकतेची ताकद दाखविली. आपल्या उज्वल भविष्याप्रती संकल्प प्रेरणा, ऊर्जा घेऊन देश पुढे जात राहिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १३० कोटी भारतीयांनी संकल्प केला, आत्मनिर्भर भारत बनण्याचा. आत्मनिर्भर भारत आज सगळ्या भारतीयांच्या मनात मस्तिष्कात रुजला आहे. आज सगळीकडे त्याची छाप आहे. आत्मनिर्भर भारत आज १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आपल्याला माहित आहे जेव्हा मी आत्मनिर्भर बाबत बोलतो तेव्हा २५-३० वर्षांवरचे नागरिक असतील, त्यांनी आपल्या घरात ऐकले असेल, मुले २०-२१ वर्षांवरची असतील तर ते आपल्या पायांवर उभे राहण्याची अपेक्षा करतील. आपण स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या काळापासून एक पाऊल दूर आहोत. भारतालाही आपल्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याच्या लढ्यात यशस्वी होईल.
भारताला आत्मनिर्भर बनणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे ते देशासाठी देखील आवश्यक आहे. म्हणूनच मला विश्वास आहे ,भारत हे स्वप्न साकार करू शकेल. या देशाच्या नागरिकांच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, देशाच्या प्रतिभेचा अभिमान आहे, मला देशाच्या युवकांमधील, महिलांमधील सामर्थ्यावर विश्वास आहे. भारताची विचारसरणी, दृष्टिकोन यावर विश्वास आहे. इतिहास साक्ष आहे. भारत जे ठरवतो ते करून दाखवतो. आणि म्हणूनच आत्मनिर्भर भारत-बाबत जगाला उत्सुकता आहे