India Languages, asked by nafisraza6649, 11 months ago

स्वातंत्रदिना वर आधारित भाषण
Essay on Independence Day in Marathi

Answers

Answered by Mandar17
1

१५ ऑगस्ट १९४७  दिवस संपूर्ण भारतीयांसाठी एक  सगळ्यात महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे .जो कि स्वातंत्रदिन म्हणून ओळखला जातो. इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी काबीज केले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली . परंतु इंग्रजांच्या त्रासाला संपूर्ण हिंदुस्थान कंटाळला होता . आपला देश आपलाच आहे आणि आपलाच राहणार तो दुसऱ्याच्या हाती कदापि लागणार नाही अशी भावना मनात घेऊन अनेक क्रांतिकारानी आपले रक्त या देशासाठी सांडले . आणि या क्रांतिकारच्या अथक प्रयत्नांना आणि सांडलेल्या रक्ताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी यश आले . या वेळी मात्र इंग्रजांनी भारत-पाकिस्तान असे विभाजन के जे आपल्यला आता त्रासदायक ठरत आहे . स्वातंत्रदिनी सर्वत्र देशसेवेचे सूर उमटलेले असतात . हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशात सर्वत्र ठिकाणी झेंडावंदन तसेच देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आखले जाते.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.

Similar questions