Hindi, asked by Ashishkumar6248, 2 days ago

संवाद लेखन दोन बस मधील प्रवाशांमधील वाढते तापमान या विषयी

Answers

Answered by himab8420
0

Answer:

सध्या जी तापमानवाढ होत आहे ती खूप जलदगतीने होत असल्याचं दिसत आहे. नैसर्गिक घटनांमुळे होणाऱ्या तापमानवाढीचं प्रमाण हे मानवनिर्मित घटनातून होणाऱ्या तापमान वाढीपेक्षा जास्त झालं आहे. म्हणजेच निसर्ग बेभरवशाचा झाला आहे. ही बाब वैज्ञानिकांना चिंताजनक वाटते. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील असं त्यांना वाटतं.

हवेतील पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि इतर वायूमुळे पृथ्वीच्या भूपृष्ठाचे आणि वातावरणाचे तापमान वाढते त्याला हरितगृह परिणाम म्हणतात, तर या वायूंना हरितगृह वायू म्हणतात.

वातावरणाच्या थरांवर सूर्यकिरणे पडतात. वातावरणाचे थर सूर्यकिरणांना शोषून घेतात किंवा ते उत्सर्जित होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी सूर्यकिरणं हरितगृह वायू शोषून घेतात किंवा पुन्हा उत्सर्जित करतात. याच सौरऊर्जेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापतं. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचं तापमान 30 अंशांनी कमी असलं असतं आणि जीवसृष्टीसाठी ते घातक ठरलं असतं.

ग्रीनहाऊस गॅसेसमुळे होणाऱ्या तापमानवाढीत सर्वाधिकवाटा हा पाण्याच्या वाफेचा असतो. पण हा परिणाम काही

दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. पण त्याच तुलनेत कार्बन डायऑक्साईड गॅसेस वातावरणात जास्त दिवस टिकतात. हा परिणाम पूर्णतः जाण्यासाठी किंवा औद्योगिक क्रांतिपूर्व अवस्था येण्यासाठी काही शतकं लागू शकतील. त्यात भर म्हणजे हा कार्बनडायऑक्साईड समुद्र शोषून घेतो आणि याचा परिणाम समुद्री जीवसृष्टीवर होतो.

इंधनाच्या ज्वलनातून आणि जंगलतोडीमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. मानवी हालचालीमुळे मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड हे ग्रीनहाऊस गॅसेस तयार होतात. पण कार्बन डायऑक्साईडच्या तुलनेत हे प्रमाण नगण्य आहे.

1750ला औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाल्यापासून कार्बन डायऑक्साईड 30 टक्क्यांनी वाढला आहे तर मिथेनचं प्रमाण हे 140 टक्क्यांनी वाढलं आहे. मागील 8,00,000 वर्षांच्या तुलनेत कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सर्वाधिक वाढलं आहे.

जागतिक तापमानवाढीचा पुरावा काय?

काही लोक असं म्हणतात की जागतिक तापमानवाढ किंवा हवामान बदल असं काही नसतं. पण ती गोष्ट आहे याचे पुरावे वैज्ञानिकांनी दिले आहेत. गेल्या शंभर वर्षांत पृथ्वीचं सरासरी तापमान 0.8 डिग्रीनं वाढलं आहे आणियातली धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या तीन दशकातच 0.6 डिग्रीनं तापमान वाढलं आहे.

सॅटेलाइटचा डेटा असं दाखवतो की अलीकडच्या दशकात सागरी पातळीत 3mmची वाढ झाली आहे. उष्णतेमुळे पाण्याचं प्रसरण होतं त्यातून ही पातळी वाढल्याचं निदर्शनास आलं आहे. जसं वातावरण वाढतं तसं आधी एकमेकांजवळ असणारे रेणू हे दूर जातात त्यामुळे पाण्याची पातळी वाढते.

त्याचबरोबर हिमनग वितळणं आणि हिमखंड वितळणं हे देखील महत्त्वपूर्ण कारण आहे. अंटार्टिकातला तसेच जगातल्या इतर भागातला बर्फ वितळत आहे. 1979 पासून आर्टिक महासागरातली हिमक्षेत्र सातत्यानं कमी होत आहे. हिमक्षेत्र वर्षाला सरासरी चार टक्क्यांनी कमी होत आहे.

2012मध्ये समुद्रातलं हिमक्षेत्राचं प्रमाण विक्रमी पातळीवर घसरलं होतं. 1979 ते 2000 या काळातील सरासरीच्या तुलनेत ते 50 टक्के कमी होतं.

गेल्या काही वर्षांत ग्रीनलँडमधल्या हिमखंड झपाट्याने वितळले जात आहेत. जर 2.8 दशलक्ष क्युबिक किमीचे हिमखंड वितळले तर समुद्राची पातळी सहा मीटर नं वाढेल.

या हिमखंडांचं वस्तुमान घसरत असल्याचंही डेटा सांगतो. याआधी पूर्व अंटार्क्टिकातील बर्फाच्या तापमानात चढउतार होताना दिसत नव्हती पण आता तिथं देखील हे बदल घडत आहेत. काही ठिकाणी वस्तुमान वाढणं हेदेखील धोक्याचं लक्षण मानलं जातं.

हवामान बदलाचा फरक वनस्पती आणि वन्य प्राण्यांवर

पडताना दिसतो. याचा परिणाम असा दिसत आहे की काही वनस्पतींना फुलं लवकर लागत आहे आणि फळंही लवकर येताना दिसत आहेत आणि प्राण्याच्या हद्दीत फरक दिसत आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढून देखील जागतिक तापमानवाढ झाली नसल्याचं काही वैज्ञानिक म्हणत आहेत. या स्थितीला 'पॉज' असं म्हणतात. ही गोष्ट वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं समजावून सांगितली आहे.

पण खरा प्रश्न हा आहे की या देवाण-घेवाणीत संतुलन कसं निर्माण राहील?

Explanation:

Hope you get the points you need :)

Similar questions