India Languages, asked by chitragchitra5589, 10 months ago

संवाद नदी व समुद्र इन मराठी

Answers

Answered by sharmaanitasharma41
5

Answer:

नदी में पानी समुद्र से ही आता है

Answered by Qwrome
7

संवाद नदी व समुद्र यांच्यातील संवाद मराठीत पुढीलप्रमाणे

(अश्या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपण एखाद्या विषयाला धरून संवाद लिहावा जसा इथे आपण पाणी प्रदुषणाच्या दृष्टीने संवाद लिहित आहे. आपण एखादा दुसरा विषय घेऊ शकता.)

नदी: नमस्कार समुद्र दादा, मी नदी.

समुद्र: नमस्कार नदी ताई, मी समुद्र.

नदी: कस काय चाललंय मग? तुम्हाला तर माझ्यापेक्षा खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत.

समुद्र: हो नदी ताई मला खूप जणांची मदत करावी लागते. तसं तुमचाही महत्व कमी नाही म्हणा. तुमचे पाणी गोड असते जे अनेकांची तहान भागावते.

नदी: हो ते तर आहेच. तुमचे पाणी खारे असल्याने ते पिण्यायोग्य नसते. पण तुमचेही कार्य महान आहे.छोट्या मोठ्या अनेक जीवांना तुम्ही आश्रय देता.

समुद्र: हो हे तर खरेच आहे.पण मला एका समस्येने ग्रासले आहे.

नदी: कोणती समस्या समुद्र दादा?

समुद्र: अहो तीच समस्या तुमचीही आहे.

नदी: कोणती समस्या दादा? मला काही कळले नाही.

समुद्र: अहो प्रदूषणाची समस्या.

नदी: हो दादा हे खरे आहे. मलाही याच समस्येने ग्रासले आहे.

समुद्र:अहो ह्या मानवनिर्मित रासायनिक द्रव्यामुळे माझ्या आश्रयाला आलेले अनेक पर्णी वनस्पती मरण पावतात.

नदी: माझीही तीच समस्या आहे समुद्र दादा. माझेही काही भाग हे राहण्यायोग्य    राहिलेले नाही.

समुद्र: मला वाटते,यावर उपाय म्हणजे वेळीच माणसाने सावध होणे.

नदी: हो तुमचं म्हणणे बरोबर आहे. माणूस वेळीच उपयोजना करू लागला तर आपला ऱ्हास होणार नाही. यातच त्याचे हित आहे.

#SPJ2

Similar questions