Social Sciences, asked by pallu111, 9 months ago

संविधान दिन या विषयी महिती लिहा .​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान समितीने स्वीकारला होता.भारताची राज्यघटना 26 नोव्हेंबर ला तयार झाली असली तरी ही घटना 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय जनतेला अर्पण का करण्यात आली?? त्याविषयी आपण थोडे जाणून घेऊ या - लाहोर येथे झालेल्या काँग्रेस च्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी पहिल्यांदा करण्यात आली आणि 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून प्रतिकात्मक स्वरूपात साजरा केला जाईल असा ठराव झाला होता. पण आपल्याला प्रत्यक्षात स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट ला, त्यामुळे इतिहासातील या दिवसाचे महत्व अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने 26 नोव्हेंबर ला घटना तयार होऊन ही ती 26 जानेवारी ला जनतेस अर्पण करण्यात आली आणि हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले.

Answered by Anonymous
0

Similar questions