History, asked by karmakarkeshab549, 7 months ago

स्वच्छ भारत सुंदर भारत essay in Marathi only
didn't want any irrelevant answer​

Answers

Answered by vjoshi10
1

Answer:

आमचा भारत देश हा एक विविधता आणि संस्कृती वाला देश आहे. या देशाला प्राचीन काळी सुवर्ण पक्षी या नावाने ओळखले जात असे.

भारत देश हा एक विकसनशील देशांच्या यादीमध्ये येतो. परंतु या देशावर काही विदेशी आक्रमण झाल्याने देशाची स्थिती वाईट झाली. या देशातील नागरिक हे स्वच्छतेवर विशेष ध्यान देत नव्हते.

त्यामुळे देशामध्ये कुडा – कचरा हा मोठ्या प्रमाणात वाढू लागला होता आणि कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने अन्य प्रकारची रोगराई पसरू लागली. म्हणून स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारने चालवलेल्या एका महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे.

स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात

आमच्या भारत देशाचे पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात २ आक्टोबर, २०१४ साली महात्मा गांधी जयंती निमित्त केली होती. स्वच्छ भारत अभियानाला स्वच्छता अभियान असे सुद्धा म्हटले जाते.

स्वच्छतेच्या प्रति भारत देशाची प्रतिमा बदलण्यासाठी श्री नरेंद्र मोदी यांनी देशाला या मोहीमेला जोडण्यासाठी जन आंदोलन करून याची सुरुवात केली.

Similar questions