स्वच्छ भारत या विषयावर निबंध लिहा
Answers
Answered by
3
स्वच्छ भारत, सुंदर भारत, निरोगी भारत... किती छान आहे ही कल्पना. नुसती कल्पनाच करून पहा कि आपला भारत देश स्वच्छ झाला, कुठेही कचऱ्याचा ढीग नाही, कोणी रस्त्यावर कचरा फेकणार नाही, कोणी रस्त्यावर थुंकणार नाही. स्वच्छ रस्ते, इमारती, चैक, बसस्टँड, रेल्वे स्टेशन सगळीकडे स्वच्छताच स्वच्छता असा विचार करताच प्रश्न पडतो की, काय हे शक्य आहे? उत्तर हो आहे. चलातर मग निश्चिय करूया आणि स्वच्छ भारत या चळवळीत सहभागी होवूयात. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वप्रथम शपथ घ्या की, तुम्ही रस्त्यावर व सार्वजनीक ठिकाणी कचरा फेकणार नाही, कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावाल. जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घ्याल. ‘घर स्वच्छ तर परिसर स्वच्छ, परिसर स्वच्छ तर गाव स्वच्छ आणि गाव स्वच्छ तरच देश स्वच्छ.’
Similar questions