Environmental Sciences, asked by shreyashGV, 1 month ago

स्वच्छतेचे महत्त्व सांगून त्याचे फायदे लिहा

please उत्तरे नीट द्या ​

Answers

Answered by Anonymous
5

स्वच्छतेचे महत्त्व:

आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणीही नाकारू शकत नाही. स्वच्छ परिसर, हवा, पाणी, वातावरण कोणाला नकोसे असते. स्वच्छतेने रोगराई नाहीशी होते, आजार पसरत नाहीत, आणि आपली जीवन शैलीही बदलून जाते. स्वच्छ परिसरातील लोकं मॉर्निंग वॉल्क किंवा जॉगिंग ला जास्त जाताना दिसतात, अश्या चांगल्या सवयीचा आपल्या जीवनावर खूप चांगला परिणाम होतो. स्वच्छ पटांगणात मुले खेळतात. आपले विडिओ गेम, मोबाईल दूर करून मैदानात येतात, ऍक्टिव्ह होतात. याचा फायदा असा होतो कि मुलांचा अभ्यासाचा ताण कमी होतो, ती खूष राहू लागतात.

आपल्याया हे सगळे माहीत आहे, पण तरीही आपण या साठी काहीच करत नाही. आपण आपले घर स्वछ ठेवतो आणि परिसराकडे दुर्लक्ष करतो. घर आपले परिसर दुसर्यांचा या विचाराने आपल्या भारताचा ऱ्हास केला आहे. स्वच्छता हे फक्त सरकार चे काम नाही, हां त्यांची जबाबदारी जरूर आहे. सरकारने योग्य त्या सुविधा पुरवल्यातच पाहिजेत. पण जो पर्यंत आपण स्वच्छता-प्रिय होत नाही, स्वच्छतेचे महत्व, फायदे जाणून घेत नाही तो पर्यंत काहीही बदल होणार नाही.

जर आपल्याला स्वच्छ भारतचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर, सरकार आणि आपल्याला एकत्र काम करावेच लागेल. सरकारच्या “स्वच्छ भारत अभियान“ मध्ये सहभाग घ्यावा लागेल. अश्या मोहिमेला साथ दिली पाहिजे.

आपण येथे मूलभूत स्वच्छताविषयक समस्या आणि संबंधित पायाभूत सुविधांशी व्यवहार करीत आहोत, त्यामुळे अचानक दैदिप्यमान फरक जाणवेल असे स्वप्न पाहणे थोडे अवास्तवच ठरेल. इथे लोकांना बदलायची गरज आहे, हे फक्त एकट्या सरकारचे काम नाही. आपल्यात स्वच्छतेची, सुंदरतेची आवड निर्माण झाली पाहिजे या शिवाय कुठलाच मार्ग नाही. स्वच्छ भारत मोहिमेची सुरूवात सरकार आणि नागरिक भागीदारीपासून झाली परंतु आता दिसते की फक्त सरकारच काम करत आहे, आम जनता त्यांची साथ सोडत आहे।

अशी प्रचंड कार्ये साध्य करण्यासाठी सरकार आणि जनतेची भागीदारी आवश्यक आहे नाही तर ते यशस्वी होणार नाही. सरकार त्यांचे काम करत आहे पण जनतेने आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. लोकशाहीत आपल्याला अधिकार मिळतात, परंतु आपण हे विसरतो की अधिकारांसोबत कर्तव्ये ही येतात. आपण आपली कर्तव्य विसरतो आणि केवळ अधिकारांसाठी आंदोलन करतो. भारत स्वच्छ करण्यासाठी आपण लोकांना पुढाकार घेण्याची गरज आहे, केवळ सरकारच हे करू शकत नाही.

आज मी तुम्हा सर्वांना स्वच्छतेची शपथ घेण्याची विनंती करतो. अशा चांगल्या कारणासाठी सरकारला समर्थन देऊयात. या देशाचे भविष्य आपल्या, युवांच्या आहेत आहे. लक्षात ठेवा,”कुठलाही देश परफेक्ट नसतो तो बनवावा लागतो“. माझ्या बरोबर म्हणा, “आज मी ग्रीन आणि क्लीन इंडिया बनविण्यासाठी प्रतिज्ञा घेतो, मी रस्त्यावर कचरा फेकणार नाही आणि कुणाला फेकू ही देणार नाही. मी माझ्या घरच्यांना आणि मित्रांना स्वच्छतेचे महत्व पटवून देईन. मी माझ्या भारताला स्वच्छ आणि सुंदर बनवेन कोणी साथ दिली किंवा नाही दिली तरी”. स्वच्छ भारत समृद्ध भारत. जय हिंद, जय भारत.

Attachments:
Similar questions