(१३) स्वमत
(अ) ‘आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं’, या वाक्याचा तुम्हांलासमजलेला अर्थ स्पष्ट करा.(आ) ‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.(इ) तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.
Answers
(१३) स्वमत
(अ) ‘आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं’, या वाक्याचा तुम्हांलासमजलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर :- एखाद्या परीक्षेत नापास झाल्यामुळे किंवा पेपर चांगला न गेल्यामुळे किंवा कठीण गेल्यामुळे , विद्यार्थी आत्महत्या करतात किंवा तसा प्रयत्न करतात , हे आपल्याला अनेकदा ऐकू येते, हे सर्व चूक आहे. आपल्याला ध्येय सध्या करतांना अनेक अडचणी ह्या येणारच परंतु त्या सर्व अडचणींवर मात करून पुढे-पुढे चालत राहणे हेच आपले कर्तव्य आहे . जर असे केले तरच आपण आपल्या यशाच्या मार्गापर्यंत पोहचू शकतो. त्यासाठी कष्ट व परिश्रम करणे व चिकाटीने मेहनत करणे आवश्यक आहे. तसेच आपले ध्येय काय आहे हे आधी ठरविणे गरजेचे आहे, व तश्या प्रकारे प्रयत्न चालू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अश्याप्रकारे आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास कोणतेही कठीणातले काठीण कार्य पूर्ण होऊ शकते व आपले प्रयत्न निष्फळ न ठरता नेहमी सफल होते.
(आ) ‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर :- अपंग असलेल्या अरुणिमाणे जिद्दीने स्वतःहामधला वेगळा गुण ओळखला. स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी एक अरुणिमा असतेच .फक्त तिचे/त्याचे ध्येय वेगळे असते. आपल्यातला असा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता हे आपण जाणले पाहिजे व त्या गुणांची जोपासना केली पाहिजे. जिद्दीने तो गन पूर्ण करण्यासाठी झटले पाहिजे तरच आपण त्यात यशस्वी होऊ.
(इ) तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.
उत्तर :- आपले ध्येय हे आपल्यासाठी फार महत्वाचे असते. तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवत असतात. म्हणून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ते नीट समजून घेतले पाहिजे. पर्वतांमध्ये एव्हरेस्ट जसा सर्वात उंच आहे, तसेच आपले ध्येय आयुष्यातील सर्वात उंच व सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे आपल्या मनातील एवरेस्टचीच होय. या एवरेस्ट चा आपण शोध घेतला पाहिजे. तो सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""गोष्ट अरुणिमाची"" या पाठातील आहे. या पाठात लेखिका सुप्रिया खोत यांनी सामान्य मांसामधील असामान्यत्व दाखवून दिले आहे. अरुणिमा सिन्हा हिच्या जिद्दीची कहाणी या पाठात सांगितली आहे.
★ स्वमत
(अ) ‘आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं’, या वाक्याचा मला समजलेला अर्थ.
उत्तर- आपले ध्येय हे आपले साध्य असल्यामुळे ते जास्तीत जास्त उच्च दर्जाचे राखले पाहिजे. ते मिळवताना अपयश आले तर त्यासाठी पुन्हा प्रयत्न करता येतो. परंतु ध्येय कमी दर्जाचे असेल तर आपण कितीही मोठे यश मिळवले, तरी ते यश कमी दर्जाचे असते. याचा साधा अर्थ असा की, ध्येय प्राप्त करताना आलेले अपयश हे तात्पुरते असते. त्याने खचून जात कामा नये.
(आ) ‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर- कोणतीही व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीसारखी असूच शकत नाही. प्रत्येकाच एक स्वतःच वैशिष्ट्य असतं. त्यात तो पारंगत असतो. फक्त आपण तो गुण जोपासला पाहिजे. अरुणिमाने नेमके हेच केले. तिने जिद्दीने स्वतःमधील वेगळा गुण ओळखला. स्वतःचे सामर्थ्य ओळखले आणि अशक्य अशी कामगिरी पार पाडली. तसेच प्रत्येकामध्ये अशी अरुणिमा असतेच. फक्त आपण त्याचा शोध घेतला पाहिजे.
(इ) तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.
उत्तर- प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक ध्येय निश्चित असते. तेच ध्येय आपल्या जीवनाची दिशा ठरवत असते. म्हणून ते ध्येय आपण नीट समजवून घेतले पाहिजे. पर्वतांमध्ये एव्हरेस्ट जसा सर्वात उंच आहे तसे आपले ध्येय सर्वांत उंच असले पाहिजे.
धन्यवाद...
"
Explanation: