स्वमत.
(अ) तुमच्या मते माणसाच्या जागी सर्वोत्तम पर्याय ‘यंत्र’ ठरू शकेल का? सोदाहरण स्पष्ट करा.
(आ) ‘मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर .............’ कल्पनाचित्र रेखाटा.
Answers
(अ) तुमच्या मते माणसाच्या जागी सर्वोत्तम पर्याय ‘यंत्र’ ठरू शकेल का? सोदाहरण स्पष्ट करा.
(आ) ‘मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर .............’ कल्पनाचित्र रेखाटा.
Answer :- अ) तुमच्या मते माणसाच्या जागी सर्वोत्तम पर्याय ‘यंत्र’ ठरू शकेल का? सोदाहरण स्पष्ट करा.
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "यंत्रांनी केलं बंड" या पाठातील आहे. या पाठाचे लेखक भालबा केळकर आहेत. विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस यंत्रावर विसंबून राहू लागला आहे. यंत्रांची मदत घेता घेता तो यंत्रांच्या आहारी जाऊ लागला आहे. याचे अनेक दुष्परिणाम मानवी जीवनावर होतील असा इशारा खेळकर पद्धतीने लेखकांनी या पाठातून दिला आहे.
★ स्वमत.
(अ) तुमच्या मते माणसाच्या जागी सर्वोत्तम पर्याय ‘यंत्र’ ठरू शकेल का? सोदाहरण.
उत्तर- खरं तर यंत्रे माणसापेक्षा श्रेष्ठ आहेत हे मान्यच करावे लागेल पण ती यंत्रे बनविणारा माणूसच आहे हेही मान्य करावे लागेल.
उदाहरणार्थ संगणक किती कामे वाचवितो.तो अनेक कामे अफाट गतीनं व अचूक करतो.
गणितावर तर त्याचे वर्चस्वच आहे.या क्षेत्रातील प्रगतीमुळे दैनंदिन व्यवहार सुरळीत व वेगवान झाले आहेत.घरबसल्या अनेक कामे करू शकतो.
आपला वेळ आणि मेहनत वाचते.रोबो अशा ठिकाणी काम करतात जिथे मानव जाऊ शकत नाही.
हि यंत्रे मानवाला सर्वोत्तम पर्याय मात्र कधीच ठरू शकत नाहीत.सांगितलेली कामे उत्तम पद्धतीने करतील पण ती कामे चांगली आहेत की वाईट त्या कामाने मानवजातीचे नुकसान होईल का,अशा प्रश्नांची उत्तरे ते देऊ शकत नाहीत. ती मानवच देऊ शकतो.
(आ) ‘मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर .............’ कल्पनाचित्र.
उत्तर- मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर माणसाची काहीच किंमत राहणार नाही. जर माणसाचे माणसावाचून काही अडतच नाही म्हटल्यावर माणसांचे जगणे मुश्किल होईल.
सर्व कामे यंत्रे करू लागली तर माणसांना करण्यासाठी कामच राहणार नाही.मग त्यांची उपजीविका कशी चालणार.
धन्यवाद...