३) स्वमत:आगगाडी पहिल्यांदा धावली तेव्हा तुम्ही हजर होता, अशी कल्पना करुन तुम्हांला काय वाटले ते लिहा.plzz answer fast in marathi language
Answers
Answered by
105
Answer:
उत्तर : त्या दिवशी काहीतरी आगळेवेगळे, भव्यदिव्य पाहायला मिळणार म्हणून मी मित्रांबरोबर तेथे हजर होतो. त्या दिवशी आगगाडी म्हणजेच रेल्वे पहिल्यांदा धावणार होती. हा सोहळा पाहायला तेथे लोकांची गर्दी झाली होती. बरोबर पाच वाजता आगगाडीने कूडक असा कर्णा फुंकला आणि काय आश्चर्य! ती गाडी भकभक, फकफक असा आवाज करीत जागेवरून हलली आणि पुढे निघाली! माझा डोळ्यांवर विश्वासच बसेना . मी काही तरी जादू पाहत आहे, असंच मला वाटलं. संमोहित झाल्यासारखी माझी स्थिती झाली होती. विस्तव व पाणी यांच्या साहाय्याने गाडी ओढली गेली हे मला समजले. तेव्हा या शोधाचे मला मोठे नवल वाटले.
Similar questions