स्वमत
खेळांमुळे वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनात होणारे फायदे लिहा.
Answers
Answer:
खेळ खेळणे किती हितकर असते याची जाणीव लहानपणापासून प्रत्येक मुलाला झाली पाहिजे. खेळामुळे शरीराचा आणि पर्यायाने मनाचा सर्वांगीण विकास शक्य होतो. लहानपणी शरीर कोमल आणि नाजूक असते. अशा शरीराला तंदुरुस्त आणि मजबूत बनवण्यासाठी खेळ आवश्यक असतो.
खेळाची सुरुवात कौशल्यपूर्ण असणे काही गरजेचे नसते. कौशल्य हळूहळू अनुभवातून वाढत जाते. एकदा कौशल्य आल्यास तुम्ही त्या खेळात पारंगत बनत जाता. वैयक्तिक खेळ आणि सांघिक खेळ असे दोन प्रकारचे खेळ आहेत ज्यातून तुम्ही तुमचा प्रकार आणि आवड ओळखू शकता.
शरीराचे आणि बुद्धीचे कार्य कसे चालते हे अगोदर समजून घेतले पाहिजे. बुद्धीला ज्या चालना मिळतात त्याद्वारे शरीर हालचाल करीत असते. मन यामध्ये सहाय्यकारी ठरत असते. त्यामुळे जेव्हा खेळ खेळला जातो तेव्हा मन, बुद्धी आणि शरीर या तिन्ही गोष्टींचा वापर होत असतो. खेळामुळे व्यक्तीच्या गुणांची वाढ होत असते.
खेळामुळे जीवनच एक खेळ बनून जाते. संघर्ष आणि विजय हे गुण आत्मसात केले जातात. साहसी वृत्ती आणि नेतृत्वगुण वाढीस लागतो. कुठल्याही संकटाशी सामना करण्याचे धैर्य अंगी बाणवले जाते. एकत्र मिळून एखादे काम पूर्ण करणे सहज शक्य होते. त्यामुळे शरीर क्रियाशील आणि कार्यक्षम बनते.
असे जीवनातील सुप्त गुण वाढीकरिता खेळ आवश्यक आहेच. कुठलाही खेळ तुम्ही छंद म्हणून आयुष्यभर खेळू शकता. शरीरातील सर्व अनावश्यक ग्रंथींचे शरीरातून घामावाटे बाहेर पडणे आवश्यक असते नाहीतर शरीर रोगी बनत जाते. खेळामुळे घाम येतो आणि नैसर्गिकरित्या शरीरशुद्धी केली जाते.
सर्व आजारांवर उपाय म्हणजे शारीरिक हालचाल! खेळात बौद्धिक आणि मानसिक कौशल्ये गरजेची असतातच परंतु शारीरिक क्षमता देखील वापरली जाते ज्यामुळे परिपूर्ण आरोग्य प्राप्त होते आणि कुठलाच शारीरिक आणि मानसिक आजार जवळ फिरकत नाही.
एका सुंदर आणि सशक्त शरिरातच सुंदर मन वास करत असते. हा सुविचार तुमच्याबद्दल खरा ठरवायचा असेल तर खेळ खेळायला सुरुवात करा. डॉक्टर असे म्हणतात की, जेवढा ऑक्सिजन तुमच्या शरीरात जास्त असेल तेवढे तुम्ही निरोगी असता आणि शरीरही व्यवस्थित कार्य करते. खेळामुळे दम लागतो आणि साहजिकच श्वसनक्रिया वेगाने घडत जाते. शरीरात ऑक्सिजन जास्त प्रमाणात घेतला जातो.
पूर्वी भारतात पारंपरिक आणि मैदानी खेळ खेळले जायचे. ज्यामध्ये कुस्ती, कबड्डी, खो – खो यांचा समावेश असायचा. त्यावेळी शेती आणि कष्टाची कामे असल्याने सर्वजण खेळ खेळू शकत नसत. परंतु आज प्रत्येक खेळ व्यावसायिकदृष्ट्या खेळला जातो. अनेक प्रकारचे खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जातात.
आज भारतात क्रिकेट, हॉकी, कबड्डी, फुटबॉल हे खेळ मोठ्या आवडीने खेळले जातात. तसेच वैयक्तिक खेळही खेळले जातात ज्यामध्ये बॅडमिंटन, धावणे, पोहणे, लांब आणि उंच उडी, भाला आणि थाळी फेक, कुस्ती, बॉक्सिंग इत्यादी आणि अनेक खेळ राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळले जातात.
ऑलिम्पिक स्पर्धा ही अनेक खेळांना वाव देत असते. ज्यामध्ये सर्व देशांचे खेळाडू आपली दावेदारी स्पष्ट करत असतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक खेळ व्यवसाय आणि करिअर म्हणून बघितला जाऊ लागला आहे. त्यामुळे खेळाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. निर्मल आनंद आणि आरोग्य प्राप्तीसाठी प्रत्येक व्यक्तीने एक तरी खेळ खेळावाच!
Explanation:
mark as Brilliant
Answer:
hope it will help you
plz mark as brainliest
Explanation:
अरे किती खेळतोयस! अभ्यास करायचाय की नाही? चल आधी घरी." ही वाक्ये प्रत्येक आईबाबांच्या तोंडी असतात. सगळ्या मोठ्या माणसांना असेच वाटत असते की, खेळ म्हणजे केवळ गंमतजंमत. खेळ म्हणजे फक्त वेळ घालवणे, म्हणून निरर्थक, मला हे मात्र अजिबात मान्य नाही. खेळात मुख्यत्वे मनोरंजन घडते. खूप मजा येते. मनसोक्त आनंद लुटता येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोठी माणसे दम दयायला तिथे नसतात, आमचे आम्हीच राजे असतो. त्यामुळे मुक्तपणे खेळायला मिळते. याचा आनंद मिळतोच. पण त्यात वाईट काय?
खेळात फक्त मनोरंजन असते, हे मात्र मला अजिबात मान्य नाही. मैदानात आम्ही मनसोक्त धावतो, उड्या मारतो. यामुळे चपळता येत नाही का? त्यामुळे आपोआप व्यायाम घडतो त्याचे काय? खेळून घरी जातो तेव्हा किती भूक लागते! हा फायदाही लक्षात घेतला पाहिजे.
खेळाबद्दल मी शांतपणे विचार करू लागलो, तेव्हा मला त्याचे खूपच फायदे दिसू लागले. आपल्याला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर प्रयत्न करावे लागतात. मैदानात जिंकण्यासाठी आम्ही जीव तोडून प्रयत्न करतो. प्रत्येकजण जिंकण्यासाठी धडपडतो. जिंकायचे, अधिक पुढे जायचे, अधिक प्रगती करायची ही प्रेरणा किती चांगली आहे? याच प्रेरणेमुळे माणूस प्रगती करतो ना? खेळामुळे ही प्रेरणा रुजत नाही काय? आम्ही जिंकण्यासाठी धडपडतो; आटोकाट प्रयत्न करतो. पण जिंकणारा शेवटी एकच असतो. आपण जिंकू किंवा हरू. यांतले काहीही होऊ शकते. हे सर्व आम्हांला समजते. हरल्यावर वाईट वाटते, हे खरे. पण जिंकलेल्यांचे मन:पूर्वक अभिनंदनही करतोच ना? नंतर आम्ही हसतखेळत पुन्हा खेळायला तयार होतोच की नाही? जीवनात देखील हारजीत हसतखेळत स्वीकारली पाहिजे, ही शिकवण आपल्याला खेळाच्या मैदानावरच मिळते.
खेळाचा आणखी एक फायदा आहे. जेव्हा आम्ही संघातर्फे खेळतो, तेव्हा संघाचा विजय व्हावा म्हणून जिवापाड प्रयत्न करतो. आपल्याला पडायला होईल, मार लागेल, जखमी होऊ, अशी कसलीच भीती त्यावेळी मनात नसते. आपला संघ जिंकला पाहिजे, हीच एक इच्छा आपल्या मनात असते. सगळेच जण संघासाठी धडपडत असतात. त्यावेळी कोणाच्याच मनात व्यक्तिगत स्वार्थ नसतो. या वेळी प्रत्येकजण स्वतःच्या इच्छेला, भावनेला बाजूला ठेवतो. फक्त संघाचाच विचार करतो. किती महत्त्वाचा संस्कार आहे हा!
शिवाय, आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे. सगळेच काय वर्गात, अभ्यासात हुशार नसतात. अशांच्या मनात, आपले जीवन व्यर्थ आहे, असा न्यूनगंड निर्माण होतो. ते आत्मविश्वास गमावून बसतात. यांच्यापैकी कित्येकजण मैदानात विलक्षण कर्तबगारी दाखवतात. सचिन तेंडुलकर कुठे कॉलेजात अभ्यासात चमकला होता? म्हणजे आपली कर्तबगारी सिद्ध करायला मैदानात वाव मिळतो, हा केवढा मोठा फायदा आहे ! खेळाचे असे कितीतरी फायदे मला आठवू लागले आणि शालेय जीवनात खेळाला अभ्यासाइतकेच महत्त्वाचे स्थान आहे, हे अधिकाधिक पटू लागले.
क्रीडा आणि खेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ते आम्हाला निरोगी आणि फिट ठेवतात ते आपल्याला दैनंदिन जीवनातील एकता पासून एक बदल देतात. हे मनोरंजन आणि शारीरिक हालचालींचा एक उपयुक्त साधन आहे. क्रीडा आणि खेळ वर्ण इमारतींमध्ये मदत करतात. ते आम्हाला ऊर्जा आणि सामर्थ्य देतात.
खेळ आणि खेळ म्हणजे मानसिक आणि शारीरिक वाढ. क्रीडा चालू असताना आपण बर्याच गोष्टी शिकूया. आम्ही आशा आणि निराशा च्या midst मध्ये मानसिक संतुलन राखण्यासाठी कसे शिका ते आम्हाला कठीण परिस्थितीत कशी हाताळतात हे शिकवतात खेळ मित्रत्वाची भावना विकसित करतात. ते आपल्यात संघाची भावना विकसित करतात. ते मानसिक आणि शारीरिक कडकपणा विकसित करण्यात मदत करतात ते आपल्या शरीराला आकार देतात आणि ते मजबूत आणि सक्रिय करतात. ते आम्हाला ऊर्जा आणि सामर्थ्य देतात. ते थकवा आणि सुस्ती काढून टाकतात. ते रक्ताभिसरण सुधारतात. हे आमच्या शारीरिक कल्याण सुधारते
क्रीडा आणि खेळ आपल्या क्षमतेत सुधारणा करतात. ते आपली कार्यक्षमता सुधारतात. एकतर अभ्यास किंवा काम एकटा आम्हाला बाहेर टाकणे करते. आम्ही कोणतेही काम करण्यासाठी यापुढे कार्यक्षम राहणार नाही. क्रीडा आमच्या मानसिक संपुष्टात काढून टाकतात. खेळ हे शिक्षणाचा अविभाज्य भाग आहेत. खेळांशिवाय शिक्षण अपूर्ण आहे. जीवनात त्यांचे मूल्य ठेवणे, मुलांना शाळेत अगदी सुरुवातीच्या काळात काही प्रकारचे खेळ शिकवले जातात. हे दिवसचे खेळ शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग आहेत.