स्वमत लिहा --मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करू शकता ते लिहा १०वी
please help me guys
Answers
Answer:
1) मराठी भाषेत संवाद करणे.
2) मराठी भाषा संवर्धित करायची म्हणजे- त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे. एखादी भाषा संवर्धित करताना त्या भाषेचा अधिकाधिक वापर कसा करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे असते. मराठी भाषिकांची संख्या ही अधिक असली, मराठी बोलणार्यांची संख्या तुलनेने कमी होत चालली आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणारी पिढी लोप पावून व्यावहारिक भाषा इंग्रजीचा पगडा सर्वसामान्यांवर झालेला दिसतो. अनेक क्षेत्रामध्ये काम करत असताना इंग्रजी भाषेच्या ज्ञानावर तुमच्यातील बौद्धिक पातळी तपासली जाते, यावरून एक गोष्ट लक्षात येते, की- भारतात मराठी भाषक लोकांची संख्या सर्वाधिक असूनही त्यांचा व्यावहारिक उपयोग व्हावा, यासाठी प्रयत्न कमी आहेत.
मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येक प्रांतिक भाषेचा विकास झाला पाहिजे. केवळ मराठी भाषा जपण्याऐवजी आपल्या अनेक बोलीभाषाही जपणे तितकेच गरजेचे आहे. मराठीचे संवर्धन व्हायचे असेल तर या प्रत्येक बोलीभाषेचा विकास झाला पाहिजे. आजच्या पिढीतील तरुणांनी आपल्या बोलीभाषेची लाज न बाळगता त्याचा अभिमान बाळगणे ही सुद्धा भाषेच्या संवर्धनाची एक पायरी आहे.