:
स्वमत लिहा
'निसरगाच्या सोबतीने शिक्षण" याबाबत तुमचे विचार लिहा
Answers
Answer:
oo bhai kahena kya chate ho
Answer:
शैक्षणिक तत्त्वज्ञान या संकल्पनेची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि आवश्यकता समजण्यासाठी ⇨ शिक्षण आणि ⇨ तत्त्वज्ञान म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक असते.
शिकणे ही एक मानसशास्त्रीय क्रिया आहे, तर शिक्षण या संकल्पनेची व्याप्ती मोठी आहे. शिक्षण हे शाळेबरोबर संपत नाही, तर ते जन्मभर चालू असते. तसेच शिक्षण हे शाळेबाहेरही चालू असते. यातूनच औपचारिक व अनौपचारिक शिक्षण या संकल्पना पुढे आल्या.
मानवाला ज्ञात असलेली बरीच शास्त्रे वर्णनात्मक असतात मात्र तत्त्वज्ञान हे मूल्यमापनात्मक शास्त्र आहे. ते कोणत्याही गोष्टीचे मूल्य, हेतू आणि उपयोग काय आहे, हे पाहणारे शास्त्र आहे, एखादया लहान घटनेपासून ते थेट विश्वयोजनेपर्यंत सर्व गोष्टींचा व अनुभवांचा गूढार्थ शोधून काढणे व शास्त्रशुद्घ संगती लावणे, हा तत्त्वज्ञानाचा विषय आहे. तत्त्वज्ञान काहीसे अव्यक्त असते व या शास्त्रात तर्कशास्त्राच्या साहाय्याने विचार करावयाचा असतो. तत्त्वज्ञानात मोठमोठया गहन प्रश्नांचा विचार केला जातो. थोडक्यात मानवाच्या प्रकृतीचा होणारा बौद्धिक आविष्कार म्हणजे तत्त्वज्ञान होय. विश्वाच्या व जीवनाच्या वैविध्यपूर्ण तपशीलाचे सर्वसमावेशक असे संकलन करण्याचा प्रयत्न म्हणजे तत्त्वज्ञान होय. मानवाला येणाऱ्या विविध अनुभवांची संगती लावणे, त्यात एकसूत्रीपणा आणणे हे तत्त्वज्ञानाचे कार्य होय.
एका अर्थाने तत्त्वज्ञान व शिक्षण यांची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती ही एकच आहेत असे म्हणता येईल. शिक्षणाने मनुष्य ज्ञानसंपन्न व सद्गुणी व्हावा, त्याला उत्कृष्ट जीवनाचा लाभ व्हावा आणि कृतार्थतेचे समाधान लाभावे, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. का शिकवावे, कसे शिकवावे या प्रश्नांची उत्तरे या अपेक्षांनी दिली जातात. पण त्यातील उत्कृष्ट जीवन म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञान व नीतिशास्त्र यांकडे वळावे लागते. आदर्श, सुखी वा सफल, परिपूर्ण जीवन या विषयींच्या कल्पना तत्त्वज्ञानातून मिळतात. त्या साकार करण्याचा प्रयत्न शिक्षण करीत असते. याचा अर्थ असा की शिक्षण ही तत्त्वज्ञानाची क्रियात्मक, गतिमान, आचारात्मक बाजू आहे. तत्त्वज्ञान व त्याचा आचार यांत जर फारकत करावयाची नसेल, तर तत्त्वज्ञानाला शिक्षणाची जोड हवी. जिज्ञासा आणि चौकशी हीच दोहोंची पद्धती आहे. गतिमान तत्त्वज्ञान म्हणजे शिक्षण होय. तत्त्वज्ञानाप्रमाणे शिक्षणशास्त्रही जीवनाचा शोध घ्यावयाला व त्याचे स्वरूप समजून घ्यावयाला शिकवीत असते. जिज्ञासा आणि अन्वेषण हीच दोहोंची पद्घत असते.