स्वमत. मराठी- वाट पाहणे या संदर्भातील तुमचा अनुभव लिहा.
Answers
Answer:
जगातील प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी कुणाची तरी वाट बघावीच लागते. वाट बघणे हा अनुभव कधी खूप मनाला आनंद देणारा असतो तर कधीकधी तोच अनुभव कंटाळवाणा देखील असतो. खरंतर मी लहानपणापासूनच शिक्षणासाठी माझ्या मामांकडे राहायचो. आई-वडिलांपासून दूर राहण्याचे दुःख खूपच असायचे पण शिक्षणामुळे त्यांच्यापासून दूर राहणे हा एकच पर्याय होता. त्यामुळे उन्हाळ्यात परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर कधी एकदाची परीक्षा संपेल त्याचीच वाट बघण्यात मला खूप मज्जा यायची.
तो परीक्षेचा पूर्ण काळ माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा कालावधी असायचा, कारण जाणारा प्रत्येक दिवस माझी आई वडिलांना भेटण्याची आतुरता वाढवायचा. आजही ते दिवस आठवले तर मला खूप भरून येते. कारण अगदी लहान वयापासून मी आई-वडिलांपासून दूर राहत होतो. सुट्ट्यांचा कालावधी आणि त्याची वाट बघणे हा माझ्यासाठी प्रत्येक वर्षीचा अतिशय भावनिक असा अनुभव असायचा. सुट्ट्यांमध्ये जेव्हा मी घरी जायचो आणि आई-वडिलांना भेटायचो तो कालावधी माझ्या आयुष्यातील सर्वात स्मरणीय कालावधी असायचा. म्हणून मला सुट्ट्यांची वाट बघणे नेहमी आवडायचे.
Explanation: