Math, asked by sanketgaikwadpatil14, 4 months ago

१. स्वमत :- नात्यांची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा​

Answers

Answered by tejas9193
14

Step-by-step explanation:

ᗰᗩᖇᗩᎢᕼᏆ ᗩᗩᕼᗴᔑ Ꮶᗩ?? ....

Answered by mohitedivya0707
42

उत्तर:

आपला जन्म होतो,त्याच क्षणी आपल्याला कही नाती मिळतात.आई-वडिल,मुलगा-मुलगी,बहिण-भाऊ,नात-नातू,आजी-आजोबा ही नाती आपल्याला जन्माने मिळतात.ही नाती मिळवण्यासाठी आपल्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत.ही नाती आपोआप मिळतात.सुरुवातीच्या काळात तर हीच नाती,म्हणजे या नात्यांनी बांधलेली माणसे ही आपली,स्वकीय व अगदी जवळची असतात.शेजारी किंवा मित्र-मैत्रिणी ही नाती सहवासातून निर्माण होतात.हळूहळू विविध प्रसंगातून किंवा एकमेकांशी होणार्‍या वागण्यातून ही माणसे जवळची होतात किंवा दूरची होतात.वेगवेगळ्या व्यक्तींच्या स्वभावामुळे,त्यांच्या वागण्यामुळे त्यांचा सहवास सुखद बनतो,हवाहवासा वाटतो.त्यामुळे त्यांच्याशी असलेले नाते मृदुमुलायम बनते.नात्यांना असे विविध रंग असतात,विविध आकार असतात.

Similar questions