३) स्वमत: प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबतचे तुमचे मत स्पष्ट करा.
Answers
Answer:
प्रत्येकाची विचार करण्याची सवय व वेळ स्वतंत्र असते, यात शंकाच नाही. कोणाला कोणत्या वेळेला नवनवीन विचार सुचतील किंवा नवनवीन कल्पना स्फुरतील, हे सांगता येणे तसे कठीणच आहे. आमच्या कॉलनीत एक कवी राहतो. त्याला कॉलनीमध्ये चांगला मान आहे. अनेक जण त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रसंगांसाठी कविता लिहून घेतात. तोसुद्धा अतिशय आनंदाने लिहून देतो. या आमच्या कार्टून कॉलनीच्या टोकाला एक रस्ता आहे. तो रस्ता तिथेच संपतो. त्यामुळे तेथे वर्दळ नसते. हा कवी रोज सकाळी तिथे येरझारा घालत फिरत राहतो. असे चालता चालता त्याला कवितेच्या ओळी सुचतात. माझ्या वर्गात माझा एक मित्र आहे. तो अभ्यास करताना मोबाईलवर चित्रपट गीते लावून ठेवतो. त्याच्या मते, गाणी चालू असताना उत्तरे सुचतात, निबंध चांगला लिहिता येतो, गणित सहज सोडवता येतात. तो सांगतो की, गाणी चालू असताना त्याचे मन एकाग्र होते. 'काळे केस' या पाठाचे लेखक ना. सी. फडके यांना दाढी करता करता लेखन सुचत असे.
या बाबतीत काही नियम सांगता येणे केवळ अशक्य आहे. प्रत्येकाची सवय वेगळी असते. स्वतःचे मन मुक्त आणि आनंदी होण्याची वेळसुद्धा वेगवेगळी असते. मन मुक्त आणि आनंदी असते तेव्हा विचार सुचतात, कल्पना सुचते. मनाची ही अवस्था कोणाला कधी लाभेल हे काहीही सांगता येत नाही.