History, asked by i2s281204, 9 months ago

स्वमत.

(१) पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवनपद्धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा.

Answers

Answered by hardik3332
24

Answer:

रंगीबेरंगी पक्ष्यांना ओळखणे हा पक्षी निरीक्षणातील महत्त्वाचा टप्पा असतो. पक्ष्यांशी मैत्री करण्यासाठी निसर्गात मुक्तपणे फिरणे गरजेचे असते. औरंगाबाद परिसरात हिवाळ्यातच पक्षी निरीक्षण करण्याचा ट्रेंड होता. मात्र, आता उन्हाळाही पक्षीमित्रांना खुणावतोय. कॉलेज व शाळांना सुट्या लागल्या असून घरी बसण्यापेक्षा अनेकजण पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासत आहेत. रंगीबेरंगी पक्ष्यांचा किलबिलाट, मंजूळ शिळ आणि उंच भरारी...प्रत्येक पक्षीमित्रासाठी आनंदाची पर्वणी असते. हिवाळा असो की उन्हाळा. पक्षीमित्र प्रत्येक ऋतुत भटकंती करतात. शहरातील सलीम अली सरोवर, हिमायतबाग, विद्यापीठ परिसर, जायकवाडी अभयारण्य, गौताळा अभयारण्य या प्रमुख ठिकाणी पक्षीमित्रांची गर्दी झाली आहे. अगदी काही वर्षांपर्यंत हिवाळ्यातच पक्षी निरीक्षणाचा ट्रेंड होता. प्रचंड ऊन आणि पक्ष्यांची संख्या घटल्यामुळे उन्हाळ्यात अनेकजण निरीक्षण टाळतात. आता अनेकांना पक्षी निरीक्षणासाठी उन्हाळा अनुकूल वाटतोय. दुर्बिण, पेन, वही, पिण्याचे पाणी आणि थोडेसे खाद्यपदार्थ सोबत असले की झाले. पक्षीमित्र दिवसभर नवीन मित्र शोधून काढतात. कुठे चिमण्यांचा घोळका तर कुठे एकटी साळुंकी दिसते. पक्ष्यांच्या सवयी, माणसांचा वावर आणि पक्षी जीवनावरील परिणामांचा अभ्यास होतो. पावसाळ्यात नाचणारा मोर उन्हाळ्यात नाचत नाही. फ्लेमिंगोचा हिवाळ्यातील आणि उन्हाळ्यातील वावर वेगळा असतो. अशा प्रत्येक गोष्टीची तुलना करता येते. गर्दी पाहून पक्षी उडण्याची शक्यता असल्यामुळे दोघे किंवा तिघांना निरीक्षण करता येते. अगदी नवीन ठिकाणी जाणकाराचा सल्ला घेतल्यास परिसराची अचूक माहिती कळते. शांत राहूनच पक्षी जगतातील बारकावे कळतात. त्यामुळे गोंगाट टाळून निरीक्षणाचा आनंद घेण्याचे आवाहन पक्षी अभ्यासकांनी केले आहे. छंदातून आनंद मिळतो आणि मनसोक्त भटकंतीतून मरगळ निघून जाते. त्यामुळे यंदाच्या सुटीत पक्ष्यांच्या दुनियेची सैर करण्याची संधी आहे.

Answered by sondo0963
6

Answer:

 

पक्षी सहसा थव्याने राहणे पसंत करतात. पक्ष्यांमध्ये नर-मादी मिळून घरटी बांधतात. यामध्ये मादी अंडी घालते व

साधारण वीस ते तीस दिवस ती अंडी उबवते. यादरम्यान नर पक्षी अंड्यांची व मादीची विशेष काळजी घेतो. साप किंवा

इतर मोठ्या पक्ष्यांपासून आपल्या अंड्यांचे किंवा पिल्लांचे संरक्षण व्हावे, त्यासाठी ते खूप काळजी घेतात. एकदा पिल्ले

अंड्याबाहेर आल्री, की नर-मादी दोघे मिळून पिल्लांचे पालनपोषण करतात. पिल्ले उडण्यास योग्य होईपर्यंत घरट्यात

थांबतात, मोठी झाल्यावर घरटी सोडून उडून जातात. प्रत्येक पक्ष्याचा जीवनकाल भिन्न असतो. साधारणत: काही

छोट्या पक्ष्यांचा जीवनकाल आठ ते पंधरा वर्षांपर्यंत असतो, तर काही पक्ष्यांचा जीवनकाल निश्‍चित किती असतो

यासंदर्भात पक्षिमित्र, पक्षी निरीक्षणतज्ज्ञ सखोल संशोधन करत आहेत.

Similar questions