स्वमत :
रेखामावशींच्या पावलांचे वर्णन तुमचा शब्दांत लिह्य.
Answers
Answer:
मुळात ‘आजी’ हे रसायनच वेगळे असते. बालपणी आपल्याला आजी गोड गोड गोष्टी सांगणारी आजी, गाणे गात व पाठ थोपटीत झोपवणारी आजी, कुठे दुखले – खुपले तर हळदीचा लेप लावणारी आजी, कुणी आमच्यावर रागावले तर आमची बाजू घेऊन भांडणारी आजी, परीक्षेत पास झाल्यावर कौतुक करीत रुपया हातावर ठेवणारी आजी, आजारपणात जागरण करीत उशाशी बसून राहणारी आजी ! आजीची किती रूपे आठवावीत ? प्रत्येकाची आजी अशी असतेच ; पण माझी आजी वेगळीच होती. बाकी आज्या करतात ते ती करायची, शिवाय तिच्यात आणखी वेगळेपण होते.
ही माझी आजी म्हणजे आईची आई. आम्ही सर्व भावंडे आजीच्याच कुशीत वाढलो. त्याचे कारण असे, की घरातल्या बायका गर्भारपण – बाळंतपण – गर्भारपण या चक्रात व्यस्त असायच्या. कुटुंब नियोजनाच्या पूर्वी घराघरात हीच परिस्थिती असायची. अशावेळी मदतीला हवी असायची स्त्रीची आई ; म्हणजे आमची आजी.
माझी आजी ठेंगणी – ठुसकी होती. दिसायला सावळी. शिक्षण तर अजिबात नव्हते. त्या उलट माझे आजोबा पाच फूट दहा इंच. गोरेपान ! शिक्षण इंटर नापास. त्याकाळी इतके शिक्षण म्हणजे खूप झाले. ते फाडफाड इंग्रजी बोलत. घरात बोलतांनाही दोन चार वाक्ये इंग्रजीत फेकीत असत. शिव्याही इंग्रजीत देत. नातवाचे नाव घालायला शाळेत नातवाला घेऊन गेले. तेथल्या हेडमास्तरांशी विनाकारण भांडले. ” ब्लडी डॅम फूल, यू नो हू आय अॅम ? फादर ऑफ डॉ. संजीव राव एम. डी. ” त्यांच्या तार सप्तकातल्या आवाजाला हेडमास्तर नरमले. दुस-या दिवशी नातवाला अॅडमिशन मिळाली ! तो जमानाच वेगळा होता. माणसाला प्रतिष्ठा होती. वयाचा, पदाचा, विद्वत्तेचा आदर केला जायचा. अशा आजोबांनी आमच्या आजीला पत्नी म्हणून कसे स्वीकारले याचे आजही आम्हाला आश्चर्य वाटते. तिचे लग्न झाले तेव्हा तिचे वय होते दहा वर्षांचे ! पुढे तिला पाच मुले