Hindi, asked by sanchitharwalkar5151, 10 months ago

स्वमत :
संकटात सापडलेल्या एखाद्या अनोळखी व्यक्तीला तुम्ही केलेली मदत लिहा.​

Answers

Answered by Anonymous
6

Explanation:

रस्त्यावर एक माणूस कडेला बसला होता मीत्यला विचारले की काय झाले तर तो म्हणाला गायछाप आहे का, तेव्हा मी त्याची मदत केली

Answered by rajraaz85
3

Answer:

           संत तुकाराम महाराज एकदा म्हणतात "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ।" म्हणजे जेव्हा जेव्हा ही आपल्याला शक्य होईल तेव्हा तेव्हाआपण एकमेकांची मदत केली पाहिजे. दोन दिवसापूर्वी असेच रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला एक मनुष्य विव्हळतांना दिसला. त्याला खूप वेदना होत होत्या आणि तो मदतीसाठी लोकांना याचना करत होता. लोक फक्त त्याच्याकडे बघून पुढे जात होते त्याच्या त्या यातनांची कुणालाही जाणीव होत नव्हती. मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला विचारले की काय झाले. त्याने अतिशय वेदनेने कन्हतच मला उत्तर दिले, तो म्हणाला की त्याला लवकरच वैद्यकीय मदतीची गरज आहे. त्याला श्वास घेण्यासाठीही त्रास होत आहे, पण पैसा अभावी तो कुठल्याही दवाखान्यात जाऊ शकत नव्हता. त्याने तीन दिवसापासून काही खाल्ले नव्हते. व त्याची काळजी घेणार असं जवळचं कुणीही नव्हतं. खरंतर त्याला चालताही येत नव्हते. त्याचे ते वाक्य ऐकून मला खूप वाईट वाटले आणि मी ठरवले की आपण त्याला दवाखान्यात नेले पाहिजे.

            मी लवकरच निर्णय घेतला आणि येणाऱ्या रिक्षाला हात दिला. मी व त्या रिक्षावाल्याने खूप प्रयत्न करून त्या व्यक्तीला आत टाकले आणि सरळ दवाखान्यात घेऊन गेलो. मी झालेली सर्व घटना डॉक्टरांना सांगितली  आणि त्याच्यावर लवकरच उपचार करण्याची मी डॉक्टरांना विनंती केली. डॉक्टरांनीही कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता त्याच्यावर उपचार सुरू केले. मी संपूर्ण दिवस त्या अनोळखी व्यक्तीसाठी दवाखान्यात थांबलो. संध्याकाळी जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तो मनुष्य आता बरा आहे, ते ऐकून मला खूप आनंद झाला. आयुष्यात पहिल्यांदा मी काहीतरी चांगले करतोय याचा मला खूप अभिमान वाटला. तो प्रसंग माझ्या आयुष्यात कायमस्वरूपी लक्षात राहील कारण मी एका व्यक्तीचा जीव वाचवला होता.

Explanation:

Similar questions