India Languages, asked by nirmit1832, 11 months ago

स्वमत स्पष्ट करा. (अ) 'आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत' या विधानाबाबत तुमचे मत.

Answers

Answered by Aditi57413862
216

स्वमत स्पष्ट करा. (अ) 'आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत' या विधानाबाबत तुमचे मत. Answer:

Attachments:
Answered by rajraaz85
4

प्रत्येक मनुष्याचे शरीर हे त्याच्यासाठी एक वरदानच असते कारण जर शरीर सुदृढ नसेल तर तो व्यक्ती काहीही करू शकत नाही. असे म्हटले जाते की आपण सगळे शरीर रुपी राजाचे सेवक आहोत आणि या विधानाला मी पूर्णपणे सहमत आहे कारण जर आपले शरीर चांगले नसेल किंवा वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासलेले असेल तर आपण कोणतेही उपयुक्त असे काम करण्यास सक्षम राहत नाही.

माणसाचे शरीर हे वेगळे अवयवांनी बनलेले आहे आणि शरीरातील प्रत्येक अवयव हा तितकाच महत्त्वाचा असतो. आपले शरीर निरोगी असेल आणि प्रत्येक अवयव सक्षम असेल तर कुठलेही कठीण काम करण्यास आपल्याला त्रास होत नाही. माणसाला शरीराची जर साथ मिळाली तर कठीण आतले कठीण कार्य देखील मनुष्य सहज पूर्ण करू शकतो. परंतु या शरीर रुपी राज्याला जर ग्रहण लागले म्हणजेच वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासले तर आपले पूर्ण लक्ष त्या दुखण्याकडे तेच असते आणि त्यामुळे आपण ठरवलेल्या गोष्टी सहजपणे प्राप्त करू शकत नाही.

माणसाच्या आयुष्यात पैशापेक्षा किंवा धनधान्य पेक्षा सर्वात काही महत्वाचे असेल तर ते माणसाचे शरीर कारण पैसा कमावता येतो परंतु जर शरीराला एकदाचे व्याधी लागल्या तर ते रोगी बनते आणि मनुष्य कमकुवत होत जातो.

माणसाने कितीही ठरवले तरी जोपर्यंत ते त्याचे शरीर त्याला साथ देत नाही तोपर्यंत तो कुठलीही गोष्ट मिळवू शकत नाही म्हणूनच मनुष्य हा शरीररूपी राज्याचे सेवक आहे असेच मानले जाते.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर जा-

https://brainly.in/question/11322956

https://brainly.in/question/11942648

SPJ3

Similar questions