India Languages, asked by scholarbuddy, 7 months ago

स्वमत:
'सुंदर मी करणार' या आनंदवनाने जोपासलेल्या मंत्राचा तुम्हांला समजलेला
अर्थ स्पष्ट करा.​

Answers

Answered by mranonymous95
98

आनंदवन यांनी 'मी सुंदर करीन' हा मंत्र जपला.याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या आयुष्यात इतरांना मदत करणारे कार्य करू . याचा नक्कीच अर्थ असा आहे की मला योग्य गोष्टी करून आणि योग्य निर्णय घेऊन या जगाला सुंदर बनवायचे आहे. गरजू लोकांना मदत करणे हे जीवनाचे सर्वोत्कृष्ट कार्य आणि देवाची स्तुती आहे . जर आपण जगाला अधिक चांगले आणि सुंदर बनवू शकतील अशा गोष्टी करण्यास सक्षम असाल तर आपण असे करण्यास कचरू नये . जीवनात सुंदर गोष्टी केल्याने तुमचे व्यक्तिमत्वही उंचावते .

Answered by shravanipendhari
17

Answer:

'आनंदवन' हा स्वर्गीय बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात 'वरोरा' गावाजवळ सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प. आनंदवनाच्या माळरानावर कुष्ठरोगी, अंध, अपंग माणसांनी सुंदरतेचा ध्यास घेऊन एक नंदनवन उभे केले. खडकाळ जमिनीतही अन्नधान्य निर्माण करण्याची किमया बोटं झडलेल्या थिटया हातांनी करून दाखविली. शारीरिक व्याधींनी जर्जर होऊन खचलेल्या मनात सन्मानाने जगण्याची उभारी निर्माण झाली. स्वाभिमानाने कष्टाची भाकरी त्यांना मिळवता आली. सुप्त कलागुणांना वाव मिळाल्याने दैवाने मोडतोड केलेल्या चेहऱ्यांवर जगण्याचे हास्य उमलले.

समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग अशा विविध वंचित व दुर्लक्षित घटकांना माणूस म्हणून जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. नवनिर्मितीची एक दृष्टी दिली. स्वाभिमानाने जगण्याची संधी मिळालेल्यांच्या मनात आपणही काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. अर्थपूर्ण आयुष्य जगण्याच्या कल्पनेतून सुंदरतेचा ध्यास मनामनात निर्माण झाला. आपले जगणे अर्थपूर्ण करण्यासाठी 'सुंदर मी करणार' चा प्रयत्न सुरू झाला. मनामनातील नवचेतनेतून एक नवी सृष्टी आनंदवनात आकार धरू लागली.

शेती, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात लक्षयवेधक प्रयोग करून निर्माण केलेल्या आदर्शाचं आनंदवन हे एक उत्तम उदाहरण आहे. सुंदरतेचा ध्यास घेतलेल्या मनांची ही अभिनव अशी प्रयोगशाळा आहे. शारीरिक अपंगत्वाने आल्याने पंगू झालेल्या शरीर व मनाने 'सुंदर मी करणार' चा ध्यास साकार करून दाखविला आहे. शारीरिक सुंदरता नसणाऱ्यांनी निर्माण केलेले 'सौंदर्यसंपन्न विश्व' बघणाऱ्याला आजही आश्चर्यचकित करून सोडते.

Similar questions