०२ ४) स्वमत:- तुम्ही जवळून कोणता पक्षी पाहिला आहे का? त्याची वैशिष्ट्ये लिहा.
Answers
Answer:
Can you type in english...
Answer:
या वर्षी आमच्या शाळेने एक छोट्याशा सहलीचे आयोजन आमच्या शहराजवळील असणाऱ्या एका जंगलात केले होते. शाळेतील सर्व मुले व शिक्षक सकाळीच शाळेतून निघून जंगलाच्या दिशेने निघालो. सर्व मुलांमध्ये खूप उत्साहाचे वातावरण होते कारण भरपूर दिवसांनी ते जंगलात जाणार होते. माझ्याही मनात खूप उत्साह होता कारण मागील काही दिवसापासून आम्ही कुठेच गेलो नव्हतो. जंगलात आत शिरल्यावर आम्हाला वेगवेगळ्या दुर्लभ पक्षांचे, प्राण्यांचे आणि झाडांचे दर्शन होऊ लागले. मी खूप आनंदी होतो. आणि त्या आनंदात भर पडली जेव्हा अचानक आमच्या समोर एक मोर आला.
मोराला आजपर्यंत फक्त चित्रात किंवा दूरदर्शन वरतीच पाहिले होते. मोराला खूप जवळून बघण्याचे भाग्य त्या दिवशी लाभले. मोर हा अतिशय सुंदर आणि विविधरंगी दिसत होता. त्याच्या पंखांचा असणारा हिरवा आणि निळा रंग मन आकर्षून घेत होता. मोराने जसा आपला पिसारा फुलवला आम्ही सर्व मंत्रमुग्ध झालो. मोराचा आकार जवळपास ८० ते ९० सेंटिमीटर एवढा होता. त्याची ती बाकदार चोच पाहून खूप छान वाटले. जसे आम्ही मोराच्या जवळ जाऊ लागले तसा तो गर्द झाडीच्या दिशेने धावू लागला आणि त्याने एक जोराची आरोळी दिली. हे सर्व पाहून 'मोराला राष्ट्रीय पक्षी' का म्हणतात याची जाणीव पहिल्यांदा झाली.
खरंच मोराला एवढे जवळून पाहण्याचा हा क्षण आयुष्यातील खूप महत्त्वाचा क्षणांपैकी एक होता. पुढे दिवसभर जंगलात सर्व विद्यार्थी फिरले आणि संध्याकाळी सर्व जण खूप आनंदाने परत आले.