स्वमत देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचे असेल तर झाडी खूप आवश्यक आहे या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा
Answers
Answer:
सुरुवातीला प्रत्येक देशाची श्रीमंतीही तिथे असणाऱ्या संपत्तीवर ठरत असे. परंतु जर देशांमध्ये झाडीच नसतील तर तो देश प्रगती करू शकत नाही कारण जर देशांमध्ये झाडी चांगली नसतील तर त्या देशाला अनेक अशा समस्यांना सामोरे जावे लागेल. झाडे कमी असल्यामुळे वातावरणातील प्रदूषण वाढेल व त्या प्रदुषणापासून निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी त्या देशाचा अमाप पैसा खर्च होईल.
सतत कमी होणाऱ्या झाडांमुळे वातावरणाचा समतोल बिघडला आहे. आणि त्यामुळेच निसर्गाचे ऋतूंमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. ऋतूंमधील बदलामुळे अनेक समस्या तयार झाल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी देखील देशांना पैसा खर्च करावा लागतो. म्हणूनच ज्या देशाकडे झाडे जास्त असतील तो देश श्रीमंत असे मानले जाते कारण झाडे असतील तर उद्भवणाऱ्या समस्या देखील कमी होतील व देशाला संपत्ती योग्य त्या ठिकाणी प्रगतीसाठी खर्च करता येईल.