स्वमत. 'विद्यार्थ्यांच्या जीवनाचा शिल्पकार - शिक्षक' ह्या विषयावर तुमचे मत लिहा.
Answers
Answer:
विद्यार्थ्यांच्या जीवनाचा शिल्पकार - शिक्षक
Explanation:
भावी पिढी बुद्धिमान अन् राष्ट्रप्रेमी होऊन देशाचे नाव विश्वात अजरामर करेल, हे निश्चित. आज देशात मोठ मोठे शास्त्रज्ञ, विचारवंत, कायदेपंडित, डॉक्टर, राजनेता, साहित्यिक, अभिनेता, चित्रकार, समाजसेवक, इंजिनिअर, सनदी अधिकारी, आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा आहेच, असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. शिक्षकामध्ये एवढी प्रचंड प्रमाणात बुद्धिमत्ता असते की, तो बुद्धिमत्तेच्या बळावर ‘राष्ट्रपती’ या सर्वोच्च पदावर विराजमान होऊ शकतो. त्याचे उदाहरण म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होय. ‘राष्ट्रशिक्षक’ अन् भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्म दिवस देशात ’शिक्षक दिन’ म्हणून भारत सरकारतर्फे साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर डॉ. राधाकृष्णन यांना भावपूर्ण आदरांजली आणि तमाम शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
‘शिक्षण अन् तत्त्वज्ञान’ या क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केल्याबद्दल राधाकृष्णन यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार बहाल करून केंद्र सरकारतर्फे सन्मानित करण्यात आले. शिक्षकांनी शुद्धविचार, चारित्र्यसंपन्नता, संयमशीलता, निर्भयता व सदाचार या पंचसूत्रांची कास धरून विद्यार्जनाचे उत्तरदायित्व पार पाडावे, असा मोलाचा संदेश राधाकृष्णन यांनी अध्यापकांना दिला आहे. आचारविचारांना आत्मसात करून विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावा, हा त्यामागील राधाकृष्णन यांचा मूळ उद्देश होता. अशा महान राष्ट्रशिक्षकाला आमचे शतशः प्रणाम.
शिक्षकांनी या पंचसूत्रीचा अंगीकार करून तन-मन-धनाने आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याला सुयोग्य आकार द्यावा. भारताची भावी पिढी सर्वदृष्टीने सक्षम व बुद्धिमान व्हावी, यासाठी सरकारने शिक्षकांना शैक्षणिक कामाव्यतिरिक्त दुसरी ’अशैक्षणिक कामे’ (उदा. जनगणना, निवडणुकींची कामे आदी) देऊ नये, जेणेकरून ‘ते’ विद्यार्जनाचे कार्य पूर्ण क्षमतेने करू शकतील. आजचे युग माहिती-तंत्रज्ञानाचे असल्याने शिक्षकवर्गाला माहिती-तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे, याचा विचार करून केंद्र व राज्य सरकारने त्या दिशेने ठोस पावलं उचलावीत. सदर शिक्षण पद्धतीचे लोण खेडोपाडी पोहोचविण्यासाठी शासन यंत्रणेने प्राधान्याने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, जेणेकरून ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी आयटी शिक्षणात मागे पडणार नाही. यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी. समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी शासन स्तरावर प्रामाणिक प्रयत्न व्हावेत, ज्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही साक्षरतेची प्रमाण वाढू शकेल.