सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे
Answers
ANS अमृतसर
गुरु रामदास यांच्या मुलाने या सरोवराच्या मध्यभागी एक मंदिर बांधले. तेच सुवर्ण मंदिर म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. येथे एप्रिल महिन्यात बैसाखी नामक पर्व मोठ्या जल्लोषात साजरे केल जाते.
अमृतसरमध्ये काय पहाल?
सुवर्ण मंदिर- जगातील शीख बांधवाचे हे धार्मिक स्थळ आहे. या मंदिराला हरी मंदिरही म्हटले जाते. मंदिराच्या कळसाला शुद्ध सोन्याचा मुलामा लावण्यात आला आहे.
दुर्गियाना मंदिर- हे हिंदु बांधवाचे धार्मिक स्थळ असून मंदिराच्या कळसाला सोने व चांदी मुलामा लावण्यात आला आहे.
जलियनवाला बाग- सन 1919 मध्ये ब्रिटीश सरकारचा उद्दाम अधिकारी जनरल डायरने येथे सुमारे 2000 भारतीयांना गोळ्या घालून ठार केले होते. या दुःखद घटनेचे स्मरण होण्यासाठी येथे मोठे स्मारक उभारण्यात आले आहे.
बाबा अटल राय स्तंभ- गुरु हरगोविंदसिंग यांच्या नऊ वर्षीय मुलाचे हुतात्मा स्मारक आहे.
तरणतारण- अमृतसरपासून 22 कि.मी. अंतरावर तरणतारण नावाचा एक तलाव आहे. या तलावाच्या पाण्यात अनेक प्रकारचे आजार दूर करण्याची औषधी शक्ती असल्याचे मानले जाते.