स्वत:च्या कुवतीनुसार काम करणारी
Answers
Answer:
मी अमृता देवेंद्र फडणवीस (कव्हर स्टोरी)
5 वर्षांपूर्वी
कौटुंबिक-व्यावसायिक आघाड्यांचा समतोल साधण्याची क्षमता महिलांमध्ये असतेच. त्यामुळं त्यांनी स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वाचा शोध जरूर घ्यावा. पतीचं पद, पैसा आिण प्रतिष्ठेच्या वेष्टनातच पत्नीनं स्वत:चा सन्मान गृहीत धरू नये. स्वत:ची मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर तो कमवावा...
‘आपण सोबतच जेवण करूयात म्हणजे मला तुमच्यासाठी व्यवस्थित वेळ देता येईल,’ असं अमृता फडणवीस जेव्हा म्हणतात तेव्हाच मुंबईतल्या पवई या उपनगरातल्या रेनेसाँ या अकरा मजली पंचतारांकित हॉटेलच्या काॅन्फरन्स सेंटरमध्ये वावरताना मनावर येणारं दडपण दूर होतं. शांत स्वरात आपलं म्हणणं मांडण्याची त्यांची पद्धत आणि संयमित देहबोली यामुळे आपोआपच मोकळेपणा येतो व एका सेलिब्रिटीची मुलाखत घेत आहोत हे आपण विसरून जातो. हळूहळू टेबल नंबर ८१ वर गप्पांची मैफल रंगत जाते. आणि समोर येते एक अशी व्यक्ती जिला तिचं करिअर प्रिय आहे. जिचं कुटुंबावर खूप प्रेम आहे. आणि जिला मुख्यमंत्र्याची पत्नी यापलीकडे जाऊन स्वत:ची अशी एक ओळख जपायची आहे.