संयुक्त महाराष्ट्रात आंदोलनात आचार्य अत्रे यांच्या कोणत्या वृत्तपत्राने वैशि्टयपूर्ण कामगिरी केली
Answers
Answer:
It is true that they were very significant
Answer:
please give brainlist answer mark if you like it
Explanation:
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे ‘कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतरच्या अत्र्यांच्या विविधांगी कर्तृत्वाचा वेध घेताना १९६० नंतरचे अत्रे लोकांसमोर यावेत, या हेतूने त्यांच्या कन्या मीना देशपांडे यांनी ‘कऱ्हेचे पाणी’च्या पुढील खंडांची आखणी केली आहे.
तीन जानेवारीपासून अत्र्यांच्या जन्मगावी- सासवड येथे ८७ वे मराठी साहित्य संमेलन भरत आहे. त्यानिमित्ताने परचुरे प्रकाशनातर्फे ‘कऱ्हेचे पाणी’चा ६ वा खंड प्रकाशित होत आहे. त्यातील महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या पहिल्याच साहित्य संमेलनाला अत्र्यांनी केलेले मार्गदर्शन, साहित्यिकांना दिलेल्या कानपिचक्या इत्यादीचा ऊहापोह करणारा संपादित लेख..
आजचे साहित्यिक आणि साहित्यालाही अत्र्यांचे हे चिंतन लागू पडते.
मराठी साहित्य संमेलनाचे बेचाळिसावे आणि संयुक्त महाराष्ट्रातले पहिलेच अधिवेशन ठाणे येथे मे १९६० च्या ७, ८ व ९ तारखेला भरवण्याचे ठरले. संमेलनाचे निमंत्रण ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालय या संस्थेने दिले होते. संमेलनाध्यक्षपदी चिं. वि. जोशी आणि प्रा रा. श्री. जोग या नामवंत साहित्यिकांची नावे सुचविली गेली होती. आदल्याच वर्षी मिरज येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अत्यंत हिणकस प्रवृत्तीचे प्रदर्शन झाले होते. तसला काही गोंधळ ठाण्याच्या संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत होऊ नये म्हणून आचार्य अत्रे यांनी साहित्यिकांपुढील कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी ६ मार्च १९६० च्या ‘मराठा’तील अग्रलेखात लिहिले, ‘महाराष्ट्र राज्याच्या मंगल निर्मितीच्या समुहूर्तावरच महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या बेचाळिसाव्या अधिवेशनाच्या रूपाने महाराष्ट्र सरस्वती मानकऱ्यांचा दरबार ठाण्याला भरणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चिं. वि. जोशी आणि प्रा. रा. श्री. जोग यांची नावे महाराष्ट्र साहित्य परिषदेने सुचवली असून संमेलनाच्या स्वागत मंडळाच्या सभासदांनी त्यातून एकाची निवड करायची आहे. हे दोघेही साहित्यिक आपापल्या वाङ्मयीन क्षेत्रातले नामवंत महारथी आहेत.