History, asked by sanasritesh88, 6 months ago

संयुक्त राष्ट्रांचे उद्दिष्ट लिहा.​

Answers

Answered by tarunkiranp
1

Answer:

here you go

Explanation:

राष्ट्राराष्ट्रांत मैत्रीचे व सहकार्याचे संबंध प्रस्थापित करणे. आंतरराष्ट्रीय प्रश्न युद्धाच्या मार्गाने न सोडविता ते शांततेच्या मार्गाने सोडविणे. राष्ट्रसंघातील सर्व राष्ट्रे सार्वभौम व स्वतंत्र आहेत आणि त्यांनी सामुदायिक सुरक्षिततेसाठी राष्ट्रसंघाचे नियम पाळावेत |

संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे (संरा) (अरबी: الأمم المتحدة ; इंग्रजी: United Nations ; फ्रेंच: Organisation des Nations Unies ; चिनी: 联合国 ; स्पॅनिश: Organización de las Naciones Unidas ; रशियन: Организация Объединённых Наций) ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 'संरा' ची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या जागी देशा-देशांमधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरविण्याच्या उद्देशाने झाली होती. ही संस्था स्थापन करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता, पण भारताचे या संस्थेच्या कामापासून नेहमी अलिप्त राहण्याचे धोरण राहिले आहे. आपले कार्यक्रम रावबिण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत.

जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत. जगभरात असलेल्या कार्यालयांमधून वर्षभरात होणाऱ्या नियमित बैठकांमधून ’संरा’ आणि तिच्या खास संस्था सारलक्षी आणि प्रशासकीय बाबींवर निर्णय घेतात. संस्थेची सहा मुख्य उपांगे आहेत : आमसभा (मुख्य चर्चाकारी सभा); सुरक्षा परिषद (शांती आणि सुरक्षेसाठीचे विवक्षित ठराव करणारी); आर्थिक व सामाजिक परिषद (आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक सहकार्य व विकासास चालना देण्यात सहकार्यासाठी); सचिवालय (’संरा’ला आवश्यक अभ्यासकार्ये, माहिती आणि सुविधा देण्यासाठी); आंतरराष्ट्रीय न्यायालय (प्रमुख न्यायिक अंग) आणि ’संरा’ विश्वस्त संस्था (सध्या अक्रिय). ’संरा’ व्यवस्थेतील इतर प्रमुख संस्थांमध्ये विश्व स्वास्थ्य संघटना, विश्व अन्न कार्यक्रम आणि युनिसेफ यांचा समावेश *होतो. महासचिव ही ’संरा’ची सर्वात ठळक व्यक्ती असते आणि २००७ मध्ये हे पद दक्षिण कोरियाचे बान की-मून यांनी मिळविले. सदस्य राष्ट्रांकडून मिळणाऱ्या निर्धारित आणि ऐच्छिक देणग्यांमधून संस्थेला वित्तपुरवठा होतो आणि अरेबिक, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या तिच्या सहा अधिकृत भाषा आहेत. ही विश्वसंघटना आहे. सचिवालयातील मुख्य हा महासचिव आहेसयुक राज्यशांतता प्रशापित करतात.

i hope it will helpful to you

Similar questions