Political Science, asked by aniljadhav7104, 4 months ago

संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या शाखेवर अंतरराष्ट्रीय सुरक्षेची जवाबदारी आहे?​

Answers

Answered by jkour0751
0

Answer:

दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता, सुरक्षितता आणि सहकार्य यांकरिता दि. २४ ऑक्टोबर १९४५ रोजी स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संघटना. या संघटनेचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे असून तिच्या सदस्यांची संख्या १९२ (२००७) होती. दुसऱ्या महायुद्धापूर्वीच ð राष्ट्रसंघ ही संघटना अनेक कारणांनी निष्प्रभ ठरली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरूवातीस (१९३९) इंग्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांतील नेत्यांनी युद्धोत्तर काळातील समस्यांच्या सोडवणुकीचा विचार सुरू केला होता. रशिया व फ्रान्स या राष्ट्रांचे नेतेही या प्रक्रियेत सहभागी झाले. ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक्लिन रूझवेल्ट यांची अटलांटिक महासागरातील एका युद्धनौकेवर दि. १४ ऑगस्ट १९४१ रोजी भेट झाली. तीत त्यांनी युद्धाची उद्दिष्टे जाहीर केली. ती ‘ अटलांटिक सनद ’ या नावाने प्रसिद्ध आहे. याच बैठकीत युद्धोत्तर कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचा मनोदय या नेत्यांनी व्यक्त केला. फ्रँक्लिन रूझवेल्ट यांनी या भावी संघटनेस ‘ संयुक्त राष्ट्र ’ ही संज्ञा सुचविली. पुढे शत्रू-राष्ट्रांविरूद्ध एकत्रित आलेल्या सव्वीस मित्र-राष्ट्रांनी अटलांटिक सनदेला पाठिंबा दर्शविला आणि दि. १ जानेवारी १९४२ रोजी प्रथमच ‘ संयुक्त राष्ट्रे ’ या संस्थेच्या अधिकृत स्थापनेस सहमती दर्शविली. जर्मनी-जपान-इटली या शत्रू-राष्ट्रांविरूद्धच्या दुसऱ्या महायुद्धातील सामूहिक कारवाईचा उल्लेख मित्र-राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रे असा केला होता. मॉस्को येथील दि. ३० ऑक्टोबर १९४३ च्या परिषदेच्या जाहीरनाम्यात चीन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, सोव्हिएट रशिया आणि ग्रेट ब्रिटन यांनी राष्ट्रसंघाच्या जागी आंतरराष्ट्रीय संघटनेची निकड प्रतिपादिली. या चार राष्ट्रांनी डंबर्टन ओक्सच्या (वॉशिंग्टन डी. सी.) परिषदेत (सप्टेंबर-ऑक्टोबर १९४४) या नूतन संघटनेच्या सनदेचा अंतिम मसुदा (खर्डा) तयार केला. याल्टा परिषदेत (किमिया) स्टालिन, चर्चिल आणि रूझवेल्ट यांनी फेबुवारी १९४५ मध्ये असे ठरविले की, संयुक्त राष्ट्रांची सॅन फॅन्सिस्को येथे २५ एप्रिल १९४५ रोजी सर्व मित्र- -राष्ट्रांची बैठक घेऊन सनदेच्या कलमांना सहमती घ्यावयाची. त्याप्रमाणे उपस्थित ५० मित्र-राष्ट्रांच्या सॅन फॅन्सिस्को येथे दि. २५ एप्रिल ते २६ जून १९४५ दरम्यान अनेक बैठका झाल्या. त्यांवर सविस्तर चर्चा होऊन सुरक्षा मंडळाच्या रचनेसंबंधी निश्चित धोरण ठरविण्यात येऊन सनदेवर शिक्कामोर्तब झाले. या परिषदेस संस्थापित परिषद (फाउंडिंग कॉन्फरन्स) असे म्हणतात. या संघटनेची पहिली आमसभा लंडन (ग्रेट ब्रिटन) येथे दि. १० जानेवारी १९४६

Similar questions