India Languages, asked by hiteshrane28, 8 months ago

सुय नसता तर कय होईल ​

Answers

Answered by vishakhakoundal223
2

Explanation:

दररोज सूर्य उगवतो त्यामुळे सगळे कामाला जातात. हा सूर्य एखादया दिवशी उगवलाच नाही तर? मग उजाडणारच नाही. मनसोक्तपणे गादीवर लोळत पडता येईल. झाडावरच्या पक्ष्यांची झोप संपेल, पण अंधार असल्यामुळे ते उडू शकणार नाहीत. रोजच्या सारखा कोंबडा आरवणार नाही, गोठ्यातील गुरेवासरे हंबरणार नाहीत. सगळीकडे अंधारच अंधार राहील. सगळीकडचे चैतन्यच जणू हरवून जाईल.

सूर्य उगवला नाही तर... दिवसच नाही. कोणालाही कोणतेही काम करायला उत्साह वाटणार नाही. दुकाने उघडणार नाहीत. बाजार भरणार नाहीत. खरेदीविक्रीचे व्यवहार होणार नाहीत.सूर्य उगवला नाही तर हळूहळू उष्णता कमी होईल आणि थंडी वाढत जाईल, प्रथम त्या थंडीची मजा वाटेल, पण काही वेळाने मात्र कुडकुडायला होईल. आकाशात तळपणारा सूर्य नसल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्यांना ऊनही लागणार नाही आणि त्यांचे पायही भाजणार नाहीत.

असे काही फायदे झाले तरी फार काळ सूर्य उगवलाच नाही, तर सारे निसर्गचक्रच कोलमडून पडेल. झाडे, पाने, फुले, फळे फुलणार नाहीत. शेतातील धान्य कसे पिकणार ? सूर्य नाही म्हणजे पाण्याची वाफ कशी होणार? मग पाऊस तरी कसा पडणार? हे सारे लक्षात आल्यावर सर्वजण हवालदिल झाले. सूर्य केव्हा उगवणार? इतक्यात उजेड आला आणि सगळीकडे आनंदाचा कल्लोळ उठला 'सूर्य उगवला, सूर्य उगवला!'

Similar questions