सायकलची आत्मकथा, सायकलचे मनोगत मराठी निबंध, भाषण
Answers
Answer: नमस्कार मित्रांनो, मी सायकल बोलत आहे. ओळखलंत का मला? मला दोन चाके असून लोक माझा वापर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला करतात. प्रवासाबरोबरच माझ्यामुळे लोकांचा व्यायामसुद्धा होतो.
मला चालवण्यासाठी महागड्या इंधनाची अजिबात गरज नसते. माझ्याद्वारे केला जाणारा प्रवास हा अत्यंत स्वस्त असतो. मी केव्हाही लोकांच्या सेवेसाठी हजर असते. थोरामोठ्यांसह सर्वांनाच मी फार आवडते. माझ्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. त्यामुळे मला स्वतः चा खूप अभिमान वाटतो.
Explanation:
■■ सायकलची आत्मकथा■■
नमस्कार,मुलांनो मी तुमची मैत्रिण एक 'सायकल' बोलत आहे. आज मी तुम्हाला माझी जीवनकथा सांगणार आहे.
माझा जन्म एका सायकल बनवणाऱ्या कारखान्यात झाला होता. मी भडक लाल रंगाची होती व माझे तीन चाक होते. माझ्या सीटवर कार्टूनचे चित्र होते. एकदा कारखान्यातून मला आणि माझ्या इतर मैत्रिणींना एका सायकलच्या दुकानात आणले गेले. एका बाईने तिच्या लहान मुलासाठी मला विकत घेतले.
मला पाहून तिचा मुलगा खूप खुश झाला. तो माझ्याजवळ आला व माझ्यावर बसून घरभर फिरू लागला. मला मालक मिळाल्यामुळे, मी त्यादिवशी खूप खुश होते.
मी माझ्या मालकाचे खूप मनोरंजन केले. त्याला खूप आनंद दिला. तो त्याच्या आईसोबत मला घेऊन गार्डनमध्ये जात असे, त्याच्या मित्रांसुद्धा मी आवडायची. तो माझी खूप काळजी घ्यायचा, मला जपून वापरायचा.
पण, हळूहळू तो मोठा होऊ लागला, म्हणून त्याला माझ्यावर बसता येत नसे. म्हणून त्याने मला त्याच्या मावस बहिणीला देऊन टाकले. मी त्यादिवशी नाराज होती पण मला आता दुसऱ्या कोणाची मदत करता येणार, याचा मला आनंद होत होता.
तर, अशी होती माझी आतापर्यंतची जीवनकथा.