sachin tendulkar mulakhat in marathi
Answers
Answer:
मी साहित्यिक कुटुंबात वाढलो, खेळलो. माझे वडील, दोन्ही भाऊ यांनी आपली साहित्यिक प्रतिभा दाखविली आहे. त्यामुळे आयुष्यात मी जे अनुभवले, उपभोगले ते लिहिण्याची उत्तम संधी आहे, असा विचार मनात आल्यामुले मीही या पुस्तकप्रपंचात पडलो. सचिनने क्रीडा पत्रकारांशी ‘प्लेइंग इट माय वे’ या आपल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या निमित्ताने सुसंवाद साधला. मी माझे अनुभव ‘प्लेइंग इट माय वे’मध्ये सांगितले आहेत, असे तो म्हणाला. सचिनच्या या दिलखुलास चर्चेचा काही भाग...
प्रश्न : पहिले पुस्तक व प्रकाशनाआधीच झालेला वाद याबाबत काय वाटते?
सचिन : जे सत्य आहे
तेच बोललो आणि लिहिले आहे. कारकीर्दीच्या टप्प्यात काही वादग्रस्त गोष्टी घडल्या आहेत तर काही विनोदी प्रसंगही घडले. या पुस्तकात अशा काही गोष्टी आहेत की ज्या लिहिताना, माझे मत व्यक्त करताना कठीण होत होते. विशेषत: माझ्या वैयक्तिक जीवनातील गोष्टीही मी त्यात समाविष्ट केल्या आहेत. ते लिहिणे कठीण होते. तरीही तो भाग मी टाळण्याचा प्रयत्न केला नाही.
*प्रश्न : चॅपेलबरोबर झालेला पंगा?
सचिन : ग्रेग चॅपेल यांच्या कारकीर्दीत श्रीलंका व झिम्बाब्वे दौ-यात वाद निर्माण झाले. मी या दोन्ही दौ-यात गेलो नव्हतो. परंतु त्यानंतर चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेसाठी आम्ही एकत्र आलो. त्या वेळी मोहालीत प्रवासादरम्यान अजित आगरकर, जहीर खान, हरभजन सिंग व अन्य काही खेळाडूंनी ग्रेगबरोबर आम्ही सुसह्य वातावरणात नसल्याचे सांगितले. त्यानंतर मीदेखील ते अनुभवले. ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगले नसायचे. निराशाजनक वातावरण होते. अशा वातावरणात कोणताही संघ जिंकणे कठिण असते. त्यानंतर आम्ही सर्व सीनियर खेळाडूंनी बोर्डाला सांगितले, आम्ही संघाची जबाबदारी घेतो. वातावरण चांगले करतो. आम्हाला चॅपेलमुक्त करा.
*प्रश्न : मीडियाचे कारकिर्दीतील काय योगदान?
सचिन : मी अनुभवले ते लिहिताना सर्वप्रथम प्रसिद्धी माध्यमांच्या साहाय्याचा उल्लेख करावा लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्याआधीपासूनच ‘मीडिया’चे साहाय्य लाभले. मी एकदा २४ धावा काढल्यानंतर वर्तमानपत्रात माझे नाव प्रथम छापून आल्याचे मला आठवतेय. स्कोअरशीट वृत्तपत्रासाठी देणा-या व्यक्तीने मला सांगितले. ३० पेक्षा अधिक धावा काढणा-यांचेच नाव छापून येते. मी त्याला म्हटले बघ छापून येते का? मात्र त्यानंतर रमाकांत आचरेकरसरांनी मला म्हटले होते, ‘वृत्तपत्रात नाव छापून यावे असे वाटत असेल तर अधिक धावा काढत जा.’ तो आयुष्यात मिळालेला मोठा धडा होता.
*प्रश्न : मीडियाशी संबंध कसे होते?
सचिन : वृत्तपत्रात जे काही छापून यायचे त्याबाबत मी नेहमीच सहमत नसायचो. मात्र कुणालाही विरोध करून किंवा प्रतिक्रिया व्यक्त करून मला माझी मन:शांती घालवायची नव्हती. मला खेळावरच लक्ष केंद्रित करायचे होते. बॅटनेच सर्वांना प्रत्युत्तर द्यायचे मी ठरविले होते.
* प्रश्न : कर्णधार म्हणून अपयशी का ठरलास? यावर लिहिले आहेस?
सचिन : ज्यांच्यासोबत खेळलो त्यांच्यावर टिका करणे अयोग्य आहे असे मला वाटते. परंतु भारतात २० विकेट घेऊ शकू अशा विकेटस् नव्हत्या आणि आम्ही चांगली धावसंख्या उभारायचो नाही. काही वेळा विजयाच्या समिप येऊ नही निसर्गाने संधी हिरावल्या होत्या. काही अटितटीचे सामने माझ्या नेतृत्वात जिंकण्याऐवजी गमाविले होते. असे पराभव माझ्या जिव्हारी लागले. वेस्ट इंडीज दौ-यातील बार्बाडोस कसोटीतील १२० धावांची गरज असतानाही झालेला पराभव जिव्हारी लागला.
* प्रश्न : नेतृत्व का सोडले?
सचिन : नेतृत्वाचे दडपण व्यक्ती म्हणून मला खूपच जाणवत होते. प्रत्येक पराभव मला दु:खी करायचा. घरी गेल्यानंतर कुटुंबासमवेत असतानाही तो पराभव मी विसरायचो नाही. त्यामुळे मी अस्वस्थ व्हायचो. त्यामुळे नेतृत्व सोडून दडपणाशिवाय फलंदाजी करून संघाला विजयी करण्याचा निर्णय मी घेतला.
* प्रश्न : एकदिवसीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे आवडेल?
सचिन : २००७ मध्ये ग्रेग चॅपेलने मला ४थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी जायला सांगितले. तेव्हा आश्चर्य वाटले होते. कारण दोन महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत मी डावाची सुरुवात केली होती. जेव्हा जॉन राईट यांनी विचारले की, तुला पहिल्या की चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आवडेल. त्यावर मी म्हटले, संघहितासाठी आवश्यक असेल त्या कोणत्याही क्रमांकावर. मात्र मला वैयक्तीकदृष्ट्या विचाराल तर मला सलामीलाच खेळायला आवडेल.
pls mark me as brainliest