India Languages, asked by Aryunique, 3 months ago

सफाई कर्मचाऱ्याचे मनोगत निबंध???​

Answers

Answered by keshav2150
4

पालिकेच्या बिल्डिंगपासून स्टेशन फार काही लांब नव्हतं. कालच माझ्या ठेकेदाराने मला हा एर्या दिला. खरंतर गेले कित्येक दिवस मी गार्डन आणि त्या जवळचा एर्या साफ करत होतो; पण प्रकाश गावी गेला आणि त्याचं काम माझ्यावर येऊन ठेपलं. तसाही गार्डनकडला भाग रोज साफ करायची गरज नसायची. म्हणून काल जेव्हा त्याने मला ह्याबद्दल विचारलं तेव्हा माझ्याकडे आढेवेढे घेण्यासाठी कारण नव्हतं. कचर्याची हातगाडी घेऊन मी स्वतःच्याच तंद्रीत चालत होतो. माझ्या पुढे केरसुणी घेतलेली काळीकुट्ट विमल होती. माझ्याहून अर्ध वय असेल तिचं. तिचा नवरा एक नंबरचा बेवडा होता. तशी ही सुद्धा काही कमी नव्हती.

पुलावरून उतरलो. समोर बंद दुकानांची रांग दिसत होती आणि त्यासमोर विखुरलेला ढीगभर कचरा. ते बघून मी वैतागलो-

‘नालायक साल्यांना कचरा डब्ब्यात टाकायला काय होतं कुणास ठाऊक!! ह्यांनी कचरा करायचा आणि आम्ही तो काढत बसायचा. उभं आयुष्य यातच जाणार आमचं.’ मनात असंख्य शिव्या येत होत्या; पण विमल निमुटपणे कामाला लागलीही होती.

पुढे एक बस-स्टॅन्ड होतं. तिथे लोकांनी लांबच्या लांब लाइन लावली होती. आम्ही थोडे जवळ आलो तसे ४-६ नजरा आमच्याकडे वळल्या. आपण रिकामे उभे आहोत आणि बाई वाकलेय. मला कससंच झालं-

“विमलबाई, एक काम कर… ती झाडू माझ्याकडे दे, आणि इथे येऊन हे गाडं धर!”

पडत्या फळाची आज्ञा पाळत तिने पूटकन माझ्याकडे झाडू-सूप सुपूर्द केले. (कुठच्याही प्रकारे आभार न मानता.)

ती जिथे थांबली होती तिथून मी सुरवात केली. आणि रांगेतल्या कुणीतरी गुटख्याचे रिकामे पाकीट फेकले. मी त्रासून मान वर केली, त्या महाभागाचे मुखदर्शन घेण्यासाठी. ‘हाडाची काडे आणि XXचे तुणतुणे’ असा हा मुलगा तोंडामध्ये गुटख्याचा बचका भरून कुणाशीतरी फोनवर बोलण्यात दंग होता. मी चिडून ते पाकीट सुपात भरलं आणि डब्ब्यात टाकलं.

दुसरा दिवस उजाडला. तीच थंड सकाळ, तीच रांग आणि त्या मवाल्याकडून पुन्हा तोच प्रकार. पुन्हा तळपायाची आग मस्तकात. असं वाटलं की त्याच्या त्याच हातावर झाडू हाणावी.

हळू हळू तो माझ्या डोक्याचा एक एक भाग व्यापू लागला. आणि प्रत्येक वेळी मला माझ्या गार्डनची तितकीच कळकळून आठवण येऊ लागली. एका संध्याकाळी मी असाच डोक्याला हात लावून पलंगावर लकटलेलो. डोक्यात तेच विचार चालू होते-

‘गेली तीस वर्ष मी हेच काम करतोय. एवढ्यात मला लोकांच्या अशा वागण्याची सवय व्हायला हवी होती. त्या विमलला तर काहीच वाटत नाही याचे. मग मीच का इतका अस्वस्थ होतो? पण चूक ती चूकच ना, त्याची डोळ्यांना सवय कशी होणार? ते काही नाही मी त्या नालायकाला धडा शिकवणारच. जर मी खरंच त्यादिवशी त्याच्या हातावर फटका मारला असता तर? तो बारीक असला तरी माझ्यासारख्या म्हातार्याला त्याने आरामशीर लोळवलं असतं. नशीब! आपण रागाच्या भरात असं काही केलं नाही. पण त्याला मी सुनावणारंच एक दिवस. त्यालाच का? असं काही करणाऱ्या प्रत्येकालाच. निदान कामाच्या वेळेत तरी.’

दुसरा दिवस. आज जास्तं वर्दळ नव्हती. रांग ही छोटीच वाटत होती. कचरा मात्र तेवढाच होता. प्लास्टिकच्या छोट्या मोठ्या पिशव्या, कसले-बसले खोके… मी तावातावात सगळं जमा करून डब्ब्यात टाकत होतो. तेवढ्यात ते ओळखीचं पॅकेट माझ्यासमोर पडलंच. मी वैतागलो-

“आता हे थांबव रे बाबा!” माझ्या बोलण्यात माझ्याही नकळत रडका सूर आला होता.

“मला बोलताय!!” तो आश्चर्याने.

“हो. आणखी कोणाला!”

“पण काय? ‘गुटखा थांबव!’ असं म्हणायचंय का तुम्हाला?”

“नाही रे! ते तू खा; पण ती पाकीटं अशी फेकू नकोस ना!!! किती रे कचरा करता तुम्ही लोकं!!!!”

माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच त्याने ‘सॉरी सॉरी’ म्हणत ते पॅकेट विमलजवळच्या डब्ब्यात नेऊन टाकलं. डोक्यावरचं ओझं कमी झालं पण त्याबरोबर प्रचंड थकवाही आला. जमवलेला कचरा सुपात घेऊन मी डब्ब्याजवळ आलो. ह्या सगळ्या प्रकारानंतर विमलच्या चेहऱ्यावर काय होतं ते पाहावं म्हणून तिच्याकडे बघितलं तर तिचं काही तरी भलतंच चालू होतं. पदराने कसलीशी बाटली पुसत होती. मी बारीक डोळे करून तिच्याकडे निरखून बघू लागलो तर तीच तोंड विचकून म्हणाली-

“भरलेली हाय”

“दारूची बाटली!!! ही कुठे सापडली तुला???”

“इथेच…. कचर्यात!!!”

मी कपाळाला हात लावला. काय बोलणार आता!!! बोलण्यासाठी काही शिल्लकच ठेवलं नव्हतं तिने.

Answered by parthavaiya08
0

Answer:

to kaise he ap log

Explanation:

chalo lock down me bhar nikale

Similar questions