Hindi, asked by vfcfyyg, 7 months ago

सहलीसाठी जाणाऱ्या यात्रा कंपनीची जाहीरात

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

  • विद्यार्थ्यांकडून पैसे जमवायचे, सहलीचे ठिकाण ठरवायचे, एसटी महामंडळामध्ये पैसे भरून गाडी आरक्षित करायची आणि त्यानंतर सहलीच्या दिवशी विद्यार्थ्यांना सहलीच्या ठिकाणाची इत्थंभूत माहिती द्यायची. शालेय विद्यार्थ्यांची सहल म्हटली की शिक्षकांची ही कसरत ठरलेली असायची. मात्र, सहल आयोजनात अग्रेसर असणाऱ्या ट्रॅव्हल कंपन्यांनी आता खासगी शाळांसोबत महापालिका, जिल्हा परिषदेतील शाळांकडेही आपला मोर्चा वळविला असून टेलरमेड टुर्सच्या धर्तीवर आता रेडीमेड पिकनिकची एकत्रित दरपत्रके आता या शाळांकडे येऊ लागली आहेत.
  • अजिंठा, वेरुळ, रायगड, प्रतापगड, मुंबई दर्शन, नाशिक, पुणे, कोल्हापूर अशा शहरांमध्ये जाऊन तेथील इतिहास, भूगोल आणि लोकजीवनाची पुरेपूर माहिती घेण्याबरोबरच तेथील मनोरंजक आणि पर्यटक ठिकाणांना भेट देणे हा शालेय सहलींच्या आयोजनामागील मुख्य उद्देश असायचा.
  • सध्याच्या काळात हा उद्देश काहीसा मागे पडू लागला असून सहलीच्या माध्यमातून विरंगुळा आणि मनोरंजनाचे वेगवेगळे उपक्रम राबवले जाऊ लागले आहेत. खासगी वाहतूक कंपन्या, रिसॉर्टवाले आणि पर्यटन व्यवसाय करणाऱ्या कंपन्या शालेय मुलांच्या सहलींकडे लक्ष केंद्रित करत असल्याचे चित्र अगदी ठसठशीतपणे पुढे येवू लागले आहे.
Similar questions