sainik ki atma katha in marathi
Answers
रणांगणावर घायाळ होऊन पडलेल्या हवालदार शंकर पवारच्या मनामध्ये सैन्यामध्ये सामील होताना घेतलेली शप्पथ जागी झाली होती. हुतात्मा वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवुन तो सैन्यामध्ये भरती झाला होता आणि आज लढताना शत्रुच्या एका गोळीने त्याचा वेध घेतला होता. जखमी होऊन तो खाली कोसळला पण तपुर्वी त्याने ३ शत्रुच्या सैनीकांना यमसदनी धाडले होते.
असहाय्य, निर्जन स्थळी तो मदतीची वाट पहात पडला होता. जखमेतुन वहाणारे रक्त आणि क्षीण होत जाणारी शक्ती त्याची चिंता वाढवत होती. मृत्युचे भय त्याला नव्हते. सैन्यात भरती होतानाच त्याने मृत्युला आपलेसे केले होते. पण त्याला चिंता होती ती त्याच्या परीवाराची. त्याची वृध्द आई आणि पत्निची. आज जर का मला काही बरं वाईट झालं तर त्यांचं कसं होणार? याची. मिलीटरीचा शर्ट घालुन सैन्यात जायची स्वप्न पहाणाऱ्या त्याच्या लहानग्या मुलाची. एवढुश्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर तळपते तेज घेऊन सैन्यातील सैनिक बांधवांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर बनण्याची मनिषा बाळगणाऱ्या त्याच्या मुलीची.
समोरच कोसळलेल्या शत्रु-सैनीकाच्या शरीराकडे त्याचे लक्ष गेले. कोण होता तो? नाव काय त्याचे? कुठला रहाणारा? त्याच्या घरी सुध्दा माझ्यासारखाच परिवार असेल का? का मारले मी त्याला? केवळ तो शत्रु होता म्हणुन? केवळ माझ्या कमांडरने सांगीतले म्हणुन? दोन दिवसांनी कदाचीत ‘तह’ होईल. आकाश्यात शांततेचे प्रतिक म्हणुन पांढरी कबुतर सोडली जातील. सदिच्छा म्हणुन जिंकलेले प्रदेश एकमेकांना परत केले जातील, हुतात्मांची स्मारकं उभी रहातील, चार दिवस त्यांच्यासमोर मेणबत्या जळतील. नंतर? नंतर त्यांच काय? अपंग सैनिक कुठल्याश्या बॅंकेत, खाजगी कचेऱ्यात वॉचमनच्या जागी भरती होतील. हुतात्मांच्या कुटुंबांना मदत जाहीर होतील, आश्वासनं दिली जातील जी त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाहीत.
का करतो आपण युध्द? का मरतात एवढी निरपराध माणसं? सर्वजण सुख-शांतीनी नाही का जगु शकत? सैन्यावर, सुरक्षा यंत्रणेवर खर्च होणारा हा अमाप पैसा देश्याच्या, गरीबांच्या कल्याणासाठी नाही का वापरता येणार? कोण जबाबदार आहे ह्या प्रचंड विनाश्याला?
आज कुणाचीही पर्वा नं करता मी या युध्द-भुमीवर लढलो. जर उद्या मी या जगात नाही राहीलो तर सरकार माझ्या कुटुंबाची काळजी घेईल? माझ्या मुलाबाळांनी पाहीलेली स्वप्न पुरी होतील? माझ्या आईला, बायकोला सन्मानाची वागणुक मिळेल? का त्यांना आमचा ‘अमुक-अमुक’ हुतात्मा होता ह्याचे प्रमाण-पत्र घेऊन जागो-जागी ठोकऱाच खाव्या लागतील.
प्रश्न प्रश्न, प्रश्न. अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये तरळत होते ज्याची उत्तर त्याच्याकडे नव्हती. आजुबाजुला होणाऱ्या भयानक हिंसाचारामध्ये, दारु-गोळा, बंदुकांच्या आवाजांमध्ये तो घायाळ सैनीक मदतीची वाट पहात निपचीत पडुन होता.
Answer:
सैनिकाची आत्मकथा
' शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती हे गाणे ऐकतच मी लहानाचा मोठा झालो . माझ्या आजोबांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता . वडिलांनी लहानपणापासूनच माझ्यावर देशप्रेमाचे संस्कार केले होते . मी शाळेत शिकत होतो तेव्हाच मनाशी पक्के ठरवलं होतं की मोठेपणी देशाच्या रक्षणासाठी आपलं सगळं काही अर्पण करायचं . शाळेत असताना १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दोन दिवशी मला विशेष आनंद होत असे . आकाशात दिमाखात फडकणाऱ्या तिरंगी झेंड्याकडे पाहून माझे हृदय अभिमानाने भरुन येत असे . दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मी रायगड येथील सैनिकी शाळेत प्रवेश घेतला . तिथले नियम खूपच कठोर होते . पण त्यातून एक खरा ध्येयवादी सैनिक घडतो , हे मी खात्रीने सांगू शकतो . सैनिकी शाळेत रायफल चालवणं , शत्रूचा पाठलाग करणं , उंच भिती पार करणं , संगणक चालवणं , गप्त संदेश ओळखणं व पाठवणं , प्रथमोपचार करणं इ . अनेक गोष्टी शिकवत होते . त्या गोष्टी शिकताना सैनिक बनणं ही गोष्ट किती कठीण असते हे मला समजलं . सैनिकी शाळेतील अभ्यासक्रम संपल्यावर मी सैनिकी परीक्षेत उत्तीर्ण झालो . भारतीय लष्करात जवान म्हणून रुजू झालो . अंगातला गणवेश , हातातली रायफल पाहून मनाला समाधान वाटलं . दुसऱ्याच क्षणी खांद्यावर आलेल्या देशाच्या रक्षणाच्या जबाबदारीची जाणीव झाली . त्यानंतर अनेक वेळा सीमारेषेवर माझी नेमणूक झाली . कारगीलसारख्या ठिकाणी थंडीत गस्त घालत असताना फार जागरुक राहावं लागत असे . शत्रू सैन्याकडून कधी हल्ला होईल हे सांगता येत नसे . माझ्या मनात शिवाजी महाराज भगतसिंग , नेताजी सुभाषचंद्र बोस हे महान नेते डोळ्यांसमोर येत असे . त्यामुळे शत्रूबरोबर दोन हात करण्यास मी सदैव उत्सुक व तयारीत असे . माझ्या सहकार्यांना माझ्या या वागण्याचे आश्चर्य वाटत असे . कारगील युद्ध्याच्या विजयानंतर माझी नेमणूक काश्मीरच्या खोऱ्यात झाली . तेथील अस्थिर जनजीवन पाहून मनाला अतिशय यातना होत असत . त्या काळात स्थानिक लोकांच्या मदतीने आम्ही त्या अतिरेक्यांना काही प्रमाणात पळवून लावलं . स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता मी लढलो याचा मला अभिमान वाटतो . माझ्या अतुलनीय धाडसाबद्दल भारत सरकारने मला पुरस्कार दिला आहे . मी ठरवले आहे की जीवात जीव असेपर्यंत देशाचं संरक्षण करायचं . नवीन सैनिक निर्माण करायचे . त्यासाठी सेवानिवृत्तीनंतर ही मी कार्यरत राहणार आहे . नवीन पिढीच्या मनात परत एकदा देशप्रेम खऱ्या अर्थाने जागवण्याचा प्रयत्न करणार आहे . देशाविषयी वाटणारी कळकळ कृतीतून व्यक्त करण्यास सांगणार आहे . ' जयहिंद ' बोलून मी माझ्या आत्मकथनाचा शेवट करतो .