सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का आहे ?
Answers
Explanation:
सजीवांचे वर्गीकरण :
सजीवांच्या वर्गीकरणाचा आधार
आपल्या सभोवती वनस्पती आणि प्राणी यांचे असंख्य प्रकार आहेत. प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे जमिनीवर किंवा पाण्यात आण हवेतसुद्धा आढळतात.
प्रारंभीक अवस्थेतील जीवन एका सरल जिवाणूपेशीच्या रूपात होते.
या पेशीला पटलपरीबद्धीत केंद्रक नव्हते. ही पेशी म्हणजे आदिकेंद्रकी पेशी होय. उत्क्रांतीच्या ओघात आदिकेंद्रकी पेशीपासून सुस्पष्ट पटल असलेल्या केंद्रकयुक्त पेशींची उत्पत्ती झाली. ही पेशी म्हणजे पहिल्यांदा निर्माण
झालेला दृश्यकेंद्रकी सजीव होय. या पेशींपासून बहुपेशीय सजीवांची
निर्मिती झाली.
प्रत्येक सजीव रूप, जीवनपद्धती अशा लक्षणात दुसऱ्यापासून भिन्न असतो. स्वतःची वेगळी ओळख जपतो. यालाच जैवविविधता म्हणतात. सजीवांमध्ये असलेले असंख्य प्रकार व विविधता यामुळे त्यांचेही पधतशीर गत पाडणे आवश्यक ठरते.
सजीवांमधील फरक ओळखून साधारणतः समान गुणधर्म असलेल्या सजीवांचे गट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात. वर्गीकरण म्हणजे सुनियोजित पद्धतीने विविध समुहामध्ये केलेली रचना. या समूहाना 'वर्गेकक' म्हणतात.
सर्वात उच्च स्थरिय वर्गीकक म्हणजे 'सृष्टी' होय.