समोच्च रेषा याला ----- म्हणतात
Answers
Answer:
समोच्चदर्शक रेषा. समुद्रसपाटीपासून समान उंचीच्या भूपृष्ठावरील स्थळांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना समोच्च रेषा म्हणतात. भूप्रदेशाचे उठाव दाखविण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींपैकी ही एक सोपी, दर्जेदार, शास्त्रशुद्ध, अत्याधुनिक व सोयीस्कर पद्धत आहे. ज्या प्रदेशाचा समोच्चदर्शक रेषा नकाशा तयार करावयाचा आहे, त्या प्रदेशाची प्रत्यक्ष-मोजणी करून त्यातील वेगवेगळ्या स्थानकांची समुद्रसपाटीपासूनची उंची (स्थल उच्चंक) नकाशावर मांडून घेतली जाते. त्यांनतर त्यातील समान उंचीची स्थानके एकमेकांना जोडून समोच्च रेषा तयार होतात. ह्या एक प्रकारच्या उंचीदर्शक सममूल्य रेषा असतात. मूल्यदर्शक अंक त्या त्या समोच्च रेषेवर लिहिलेले असतात. स्थलवर्णनात्मक रंगीत नकाशात समोच्च रेषांचा रंग तपकिरी असतो. थोडय अभ्यासाने व सरावाने अशा नकाशाच्या निरीक्षणाने उठावाचे सामान्य स्वरूप किंवा प्रदेशाच्या उंच-सखलपणाची, उंचीची व उताराची कल्पना येते. या रेषा दाखविल्याने नकाशावरील इतर मूळ तपशीलांची स्पष्टता कमी होत नाही. उठाव दाखविण्याच्या इतर पद्धतींत समोच्च रेषा हा मूळ आधार मानला जातो. उदा., रंगपद्धती. सुरूवातीच्या काळातील हे नकाशे प्रामुख्याने फलकयंत्र व दुर्बिणयुक्त दृष्टिक्षेपकाच्या साहाय्याने व त्रिकोणीकरण पद्धतीने भूमापन करून तयार करण्यात आले. हल्लीच्या काळात हवाई सर्वेक्षण छायाचित्रे व त्रिमितीय पद्धतींचा वापर समोच्च रेषा नकाशा निर्मितीत केला जातो मात्र त्यासाठी भूमापन सर्वेक्षण पद्धतीने तयार केलेल्या नकाशातील महत्त्वाच्या संदर्भस्थानांची केलेली स्थाननिश्र्चिती व त्यांची उंची यांचा वापर केला जातो.
Answer:
pratik mntatqteiisksuuidh